२७ फेब्रुवारी २०२२

हिजाब हा धार्मिक हक्क नाही; कर्नाटक सरकारचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण


🔰हिजाब परिधान करणे हे राज्यघटनेच्या कलम १५ नुसार धर्मस्वातंत्र्याचा भाग असून राज्य सरकार त्याचे उल्लंघन करत आहे, हा आरोप कर्नाटक सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात फेटाळून लावला. हिजाब परिधान करणे कलम १५ नुसार धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारांत मोडत नसून केवळ संस्थात्मक शिस्त म्हणून हिजाबवर शैक्षणिक संस्थांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

🔰हिजाबवर शैक्षणिक संस्थांच्या आवारात बंदी नसून केवळ शिक्षण घेत असताना वर्गामध्ये बंदी घालण्यात आली आहे, असे कर्नाटक सरकारने स्पष्ट केले.

🔰कर्नाटकातील हिजाब बंदीवर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश रितू राय अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. राज्याचे महाधिवक्ता प्रभुलिंग नवाडगी यांनी कर्नाटक सरकारची बाजू उच्च न्यायालयात मांडली.

🔰‘‘हिजाब परिधान करणे हे कलम १९ (१)(अ)मध्ये येते, तर कलम २५मध्ये नाही. एखाद्या महिलेची हिजाब परिधान करण्याची इच्छा असेल तर त्याला संस्थात्मक शिस्तीनुसार परिधान केला असेल तर त्याला कोणताही विरोध नाही,’’ असे नवाडगी यांनी सांगितले. कलम १९ (१) अ अतंर्गत हा ज्या अधिकारांतर्गत हा दावा करण्यात आला आहे, तो कलम १९ (२) संबंधी असून त्यानुसार सरकार संस्थात्मक प्रतिबंधानुसार योग्य प्रतिबंध लागू करू शकते, असे नवाडगी यांनी न्यायालयाला सांगितले. राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत  राज्य सरकारचा कायदा आहे. त्यानुसार हा कायदा शैक्षणिक संस्थांच्या आवारात नाही, मात्र वर्गामध्ये शिक्षण घेत असताना हिजाब परिधान करण्यास बंदी घालतो, असे नवाडगी यांनी सांगितले.

आता_कंबाईन_पण_कात_टाकत_आहे...


अनेक नव्याने समाविष्ट होणाऱ्या पोस्ट मुळे या परीक्षेचा दर्जा पण राज्यसेवेसारखाच होईल...आणि या बदलाची दिशा आजच्या पेपरात दिसली...

परवाच आयोगाचे एक नोटिफिकेशन  आले आहे आणि त्यानुसार काही नव्या पोस्ट (उदा. दुय्यम निबंधक अराजपत्रित गट ब ) कंबाईन मध्ये पुढील जाहिरातीत ऍड होतील.... म्हणजे आता फक्त 3 पोस्ट साठी ही परीक्षा मर्यादित राहणार नाही...

मला काय जाणवले ते थोडक्यात...

भूगोल
●विचारलेले प्रश्न basics वर फोकस करणारे होते....उदा. मध्य कोकण ,त्रिवार्था ,मृदशास्त्र
●जनगणनेवरील प्रश्न हे सरळसोट न विचारता डीप आणि बहुविधानात्मक आले (जसे राज्यसेवेला असतात)
●बाकी Factual Data होताच नेहमीप्रमाणे - उदा.नदीप्रणाली ,खनिज तेल उत्पादक राज्य,NH 44

अर्थशास्त्र
काय quality प्रश्न होते....
●ज्याचा सखोल अभ्यास आहे (मेन्स च्या अभ्यासक्रमासह) त्यालाच सोडवता येण्याजोगे
●आकडेवारी पण विचारपूर्वक विचारली होती
●V Shaped Recovery डायरेक्ट आर्थिक पाहणीच्या मूळ संकल्पनेत हात घातला
●शहरीकरणासारखे प्रश्न विचार करायला लावणारे होते लगेच उत्तरापर्यंत पोहोचणे उपलब्ध वेळेत कसरतीचे होते

जनरल सायन्स
●कितीही अवघड वाटो पण सायन्स हे basic fundamental वर विचारतात.
●Daily Science - Good Cholestoral / Bad Cholestoral - repeat झालेला प्रश्न पण भारी विचारला.

गणित बुद्धिमापन
●अलीकडे सोपे प्रश्न येत आहेत मात्र उपलब्ध कमी वेळेत accuracy maintain करून प्रश्न सोडवणे हे कायम challenge आहे.

पॉलिटी
●सरळसोट पण तरीही कॉन्फ्युजन
●2020 ला पंछी आयोगावर 2021 ला सारकरिया आयोगावर
●सोपा असणारा पंचायत राज मात्र तेवढेच lengthy प्रश्न

इतिहास
●Factual ट्रेंड कायम आहे
मात्र एका प्रश्नात 4 प्रश्न विचारले होते त्यामुळे बरेच जण पॅनिक झाले

चालू घडामोडी
मी शिकवतो तो विषय...
काय बोलू प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर #समकालीन अभ्यास करायला लागेल म्हणजे 2 वर्षांच्या चालू घडामोडी वाचाव्या लागतील असे प्रश्न होते
अवनी चतुर्वेदी....फ्रान्सिस दिब्रोटो..... अभिजित बॅनर्जी.....सोनाली नावांगुळ....मेस्सी.... कारागृह पर्यटन
या मुद्द्यांची रेंज बघा 2018 पासून साधारण नोव्हेंबर 2021 अशी दिसेल

काही प्रश्न वाचल्यावर असे वाटले की राज्यसेवा मुख्य ला सेट केलेले होते की काय....

उपलब्ध 60 मिनिटात हे सर्व मॅनेज करायला खूप प्रॅक्टिस लागेल इथून पुढे

म्हणूनच आता कंबाईन पण कात टाकत आहे...

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...