१२ फेब्रुवारी २०२२

देशहितासाठी शेती कायदे मागे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्टीकरण


🔰शेती कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात आले, मात्र लोकांच्या हितासाठी ते मागे घेण्यात आले, असे उत्तर प्रदेश विधानसभेसाठी गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


🔰आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम केले असून, त्यांनीही आपल्याला पाठिंबा दिला आहे असे मोदी म्हणाले. पाचही राज्यांमध्ये भाजप विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने नेहमीच स्थैर्यासह काम केले असून, लोकांकडून पक्षाला ‘अँटी- इन्कमबन्सी’ ऐवजी ‘प्रो- इन्कम्बन्सी’चे वातावरण लाभले आहे, असेही त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.


🔰 ‘घराणेशाहीच्या राजकारणावर’ कडाडून हल्ला चढवताना, हा ‘मोठा धोका’ आणि ‘लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू’ असल्याचे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशातील ‘बनावट समाजवादी’ या कोटीबाबत स्पष्टीकरण देताना, या पक्षांना केवळ ‘परिवारवादाची’ काळजी असल्याचे त्यांनी सांगितले.


🔰 सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी अमान्य केला. ते म्हणाले की, निवडणुका असल्या तरी या यंत्रणा त्यांच्या निकषांनुसार काम करत असतात. या यंत्रणा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई करून राष्ट्रीय संपत्तीची वसुली करत असल्याने सरकारचे कौतुक करायला हवे.


Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...