३० जानेवारी २०२२

महात्मा गांधी

- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948
- 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे)
- 9 जानेवारी 1915 वयाच्या 45 व्या वर्षी गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात (बाॅम्बे) आगमन. याचवर्षी अहमदाबाद येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना
- गांधी युग 1917 ते 1947
- 9 जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस
- 2 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन
--------------------------------------------------
● चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917

- बिहारमधील निळ उत्पादक शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- पहिला सविनय कायदेभंग
- स्थानिक नेता राजकुमार शुक्ल
--------------------------------------------------
● अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918

- पहिले उपोषण / भूक हरताळ
- कापड गिरणी मालकांविरोधात
--------------------------------------------------
● खेडा सत्याग्रह (गुजरात) 1918

- पहिले असहकार आंदोलन
- सरकारविरोधी
--------------------------------------------------
● रौलट सत्याग्रह 1919

- नागरी स्वातंत्र्यावर गदा आणत असलेल्या रौलट कायद्याविरोधात
- पहिले जन आंदोलन (Mass Strike)
- जालियनवाला बाग हत्याकांडाच्या (13 एप्रिल 1919) निषेध म्हणून गांधींनी कैसर - ए- हिंद ही पदवी परत केली.
- 1919 मध्ये दिल्लीत ऑल इंडिया खिलाफत समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड
--------------------------------------------------
● असहकार चळवळ

- जून 1920 अलाहाबादमध्ये खिलाफत समितीत हा ठराव पास झाला
- काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर
- काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता
- चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित
- 1924 बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधींकडे (पहिले आणि एकमेव) टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- 1930 तत्कालीन व्हाईसराॅय लाॅर्ड इर्विनकडे गांधीजींनी 11 मुद्द्यांची मागणी केली.
--------------------------------------------------
● दांडी यात्रा

- मिठाचा कायदा मोडण्यासाठी
- 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश
- 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल
- 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला
--------------------------------------------------
● गांधी इर्विन करार 1931

- दुसर्या गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित राहणार
- संविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली
- काँग्रेसच्या कराची अधिवेशनात या कराराला समर्थन मिळाले.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 1931 संविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू ही चळवळ पुन्हा 1934 मध्ये मागे घेण्यात आली.
--------------------------------------------------
● पुणे करार 1931

- रॅम्से मॅकडाॅनल्डच्या जातीय निवड्याला विरोध म्हणून पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधींचे आमरण उपोषण
- यावरूनच महात्मा गांधी आणि डाॅ. आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झाला
- दलितांची स्वतंत्र मतदार संघाची तरतूद रद्द केली.
--------------------------------------------------
● वैयक्तिक सत्याग्रह

- 1933 मध्ये सुरूवात
- 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही
- पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही
--------------------------------------------------
● चले जाव

- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर
- महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त
- सी. राजगोपालचारी सूत्र (CR Formula): गांधी आणि जिनांची मिटिंग

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती.

🔰केंद्र सरकारने शुक्रवारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अर्थात Chief Economic Advisor (CEA) म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात चर्चा सुरू होती.

🔰अनंत नागेश्वरन यांचं नाव देखील चर्चेत होतं. त्यासंदर्भात आज दुपारी केंद्र सरकारने अधिकृत निर्णय जारी केला असून त्यानुसार नागेश्वरन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. २०२२-२३ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने नागेश्वरन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

🔰मुख्य आर्थिक सल्लागार नियुक्ती होण्याआधी नागेश्वर हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य देखील होते. याआधी नागेश्वर यांची एक लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून ओळख आहे. भारत आणि सिंगापूरमधील अनेक व्यवसायविषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलं आहे. तसेच, त्यांचे अनेक शोधनिबंध देखील प्रसिद्ध झालेले आहेत.

ब्राह्मोस निर्यातीसाठी भारत-फिलिपाइन्स करार.


🔰फिलिपाइन्सच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’शी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ३७४ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. भारताला मिळालेला ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचा हा पहिला देकार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

🔰भारत-रशियन संयुक्त उपक्रमातून ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (बीएपीएल) ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाजे, विमाने आणि जमिनीवरूनही डागता येते, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. 

🔰लढाऊ जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्यासाठी शुक्रवारी बीएपीएलने फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी करार केला, असे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे.  बीएपीएल ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)ची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. भारत सरकारच्या संरक्षण निर्यातीला चालना देण्याच्या धोरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

राज्यात ७२०० पोलिसांची भरती-गृहमंत्री.

🔰राज्यात पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली आलेली ५७०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ७२०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार आहे. याबरोबरच राज्यातील पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिली.

🔰गृहमंत्री वळसे यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी यांच्या हस्ते ‘ई-टपाल’ सेवासुविधेचे तसेच स्वागत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पोलीस अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीनंतर गृहमंत्री वळसे यांनी पत्रकारांवरील माहिती दिली.

🔰राज्यात मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांसाठी घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासंदर्भात आपल्याकडे माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...