Saturday, 29 January 2022

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती.

🔰केंद्र सरकारने शुक्रवारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अर्थात Chief Economic Advisor (CEA) म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात चर्चा सुरू होती.

🔰अनंत नागेश्वरन यांचं नाव देखील चर्चेत होतं. त्यासंदर्भात आज दुपारी केंद्र सरकारने अधिकृत निर्णय जारी केला असून त्यानुसार नागेश्वरन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. २०२२-२३ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने नागेश्वरन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

🔰मुख्य आर्थिक सल्लागार नियुक्ती होण्याआधी नागेश्वर हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य देखील होते. याआधी नागेश्वर यांची एक लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून ओळख आहे. भारत आणि सिंगापूरमधील अनेक व्यवसायविषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलं आहे. तसेच, त्यांचे अनेक शोधनिबंध देखील प्रसिद्ध झालेले आहेत.

ब्राह्मोस निर्यातीसाठी भारत-फिलिपाइन्स करार.


🔰फिलिपाइन्सच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’शी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ३७४ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. भारताला मिळालेला ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचा हा पहिला देकार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

🔰भारत-रशियन संयुक्त उपक्रमातून ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (बीएपीएल) ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाजे, विमाने आणि जमिनीवरूनही डागता येते, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. 

🔰लढाऊ जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्यासाठी शुक्रवारी बीएपीएलने फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी करार केला, असे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे.  बीएपीएल ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)ची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. भारत सरकारच्या संरक्षण निर्यातीला चालना देण्याच्या धोरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

राज्यात ७२०० पोलिसांची भरती-गृहमंत्री.

🔰राज्यात पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली आलेली ५७०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ७२०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार आहे. याबरोबरच राज्यातील पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिली.

🔰गृहमंत्री वळसे यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी यांच्या हस्ते ‘ई-टपाल’ सेवासुविधेचे तसेच स्वागत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पोलीस अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीनंतर गृहमंत्री वळसे यांनी पत्रकारांवरील माहिती दिली.

🔰राज्यात मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांसाठी घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासंदर्भात आपल्याकडे माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खालील प्रश्न सोडवा


🌀रिज़र्व बँक ऑफ़ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली??
A)1955
B)1935🛑🛑🛑
C)1949
D)1969

🌀स्टेट बँक ऑफ़ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली??
A)1965
B)1945
C)1955🛑🛑🛑
D)1935

🌀रिज़र्व बँक ऑफ़ इंडिया चे पहिले भारतीय गवर्नर कोण होते?
A)सी डी देशमुख🛑🛑🛑
B)सर ओसबोर्न स्मिथ
C)सर जेम्स ब्रेड टेलर
D)के जी आंबेगावकर

🌀विदेशात शाखा उघडणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे??
A)बँक ऑफ़ बड़ोदा
B)बँक ऑफ़ इंडिया🛑🛑लंदन(1946)
C)यूनियन बँक ऑफ़ इंडिया
D)अलाहाबाद बँक

🌀विदेशात सर्वाधिक शाखा असणारी भारतीय बँक कोणती आहे??
A)बँक ऑफ़ बड़ोदा🛑🛑🛑
B)बँक ऑफ़ इंडिया
C)यूनियन बँक ऑफ़ इंडिया
D)एक्सिस बँक

🌀.......यांनी मुंबई येथे 11 नोव्हेम्बर 1919 रोजी यूनियन बँक ऑफ़ इंडियाची स्थापना केली??
A)शाहु महाराज
B)महात्मा गांधी🛑🛑🛑
C)डॉ.बाबासाहेब आंबेडकर
D)पंडित नेहरू

🌀पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली??
A)1905
B)1895
C)1995
D)1894🛑🛑🛑

🌀इंटरनेट बँकिंग सेवा पूरवणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे??
A)Axis bank
B)ICICI bank🛑🛑🛑
C)punjab national bank
D)bank of india

🌀भारतात सर्व प्रथम ATM कार्ड सेवा पुरवणारी पहिली बँक कोणती आहे??
A)HDFC
B)Axis
C)HSBC🛑🛑🛑1987
D)IDBI

🌀क्रेडिट कार्ड सुरु करणारी भारतातील पहिली सार्वजनिक बँक कोणती आहे??
A)यूनियन बँक ऑफ़ इंडिया
B)एक्सिस बँक
C)सेंट्रल बँक ऑफ़ इंडिया🛑🛑🛑
D)देना बँक

(❗️❗️NOTE-ANSWER has been posted in red 🛑 sign❗️❗️)

जनगणना 2021

- सन 2021 मध्ये देशात जनगणना केली जाणार आहे. 2021ची जनगणना ही 16 वी जनगणना असून ती स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे.

- 160 वर्षानंतर जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच अॅपमधून नागरिकांची माहिती गोळा केली जाणार आहे. जनगणनेसाठी तयार केल्या जाणाऱ्या अ‍ॅपमुळे राष्ट्रीय जननोंदणी अस्तित्वात येणार. अ‍ॅपमुळे व्यक्तीची माहिती तात्काळ अद्ययावत केली जाऊ शकते.

▪️ठळक वैशिष्ट्ये

- जनगणना 2021 मध्ये प्रथमच माहितीचे संकलन मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पाडली जाणार. प्रथम टप्प्यात घरांची गणना करण्यात येणार आणि दुसऱ्या टप्प्यात देशातल्या रहिवाशांची गणना केली जाणार.

-भारताची जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. घर-यादी आणि घर गणना एप्रिल ते सप्टेंबर 2020 या काळात करण्यात येणार आणि लोकसंख्येची गणना 9 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत होणार आहे.

-16 भाषांमध्ये जनगणनेचे काम केले जाणार आहे. सुमारे 33 लक्ष गणक घराघरांमध्ये जाऊन लोकांची नोंदणी करणार.

- व्यय विषयक वित्त समितीने यासाठी 8754.23 कोटी रुपये खर्चाची शिफारस केली आहे.

- जनगणनेसाठी संदर्भ तारीख 1 मार्च 2021 असणार आहे. परंतू, जम्मू व काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यासारख्या प्रदेशांसाठी ही 1 ऑक्टोबर 2020 असणार.

▪️जनगणनेविषयी

-पहिली जनगणना 1872 साली लॉर्ड मेयो यांनी केली. सन 1881 पासून नियमितपणे जनगणना केली जात आहे.

- भोर समितीच्या सूचनेनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्राने घेतली, त्यासाठी ‘जनगणना कायदा-1948’ तयार करण्यात आला. भारताची जनगणना "जनगणना कायदा-1948" आणि “जनगणना नियम-1990’ (संशोधित कायदा-1993) अंतर्गत नियोजित वेळेत योजनाबद्ध रीतीने पूर्ण केली जाते.

- जनगणना आयुक्त गृहमंत्रालयाच्या अंतर्गत जनगणनेचे कामकाज पार पडले जाते. ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’ (RGI) कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली जनगणनेचे काम चालते.

- भारताचा भौगोलिक विस्तार जगाच्या भौगोलिक आकाराच्या 2.4 टक्के आहे आणि देशाची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17.5 टक्के इतकी आहे.

▪️भारताची जनगणना 2011

-एकूण लोकसंख्या : 121 कोटी.  (51.5% पुरुष, 48.5% स्त्रिया)

- ग्रामीण लोकसंख्या : 68.8%

- शहरी लोकसंख्या : 31.2%

- दशवार्षिक वृद्धीदर : 17.72%

- दशवार्षिक वाढ : 18.22 कोटी

- घनता : 382

- लिंग गुणोत्तर : 943

- लिंग गुणोत्तर (0-6 वर्ष) : 918

- साक्षरता : 72.98%

- घरांची गणना 2011

-/घरांची संख्या : 33.08 कोटी (वापर: 77.1% राहण्यासाठी; उर्वरित घरांचा इतर कामांसाठी)

- 24.67 कोटी कुटुंबे (16.78 कोटी ग्रामीण, 7.88 कोटी शहरी)

ग्रामीण विकासाच्या योजना

१)     समुदाय विकास कार्यक्रम (Community Development Programme) (२ ऑक्टो. १९५२):– ग्रामीण भागाच्या सर्वागीन विकासाठी भारत सरकारणे राष्ट्रीय पातळीवर सुरु केलेली पहिलीच महत्वाची योजना म्हणून समुदाय विकास कार्यक्रम या योजनेचा उल्लेख करता येईल.

उद्दिष्टे :– ग्रामीण भाग नेतृत्वाचा विकास करुन त्याद्वारे ग्रामीण भागाचा विकास घडवून आणणे.

२)    एकात्मिक ग्रामीण विकास योजना (Integrated Rural Development Programme):–

१९७८-७९ पासून ही योजना प्रायोगिक स्वरुपात सुरु करण्यात आली.

२ ऑक्टो. १९८० पासून हा कार्यक्रम व्यापक स्वरुपात सुरु करण्यात आला.

या योजनेच्या खर्चाचे प्रमाण केंद्र व राज्य सरकार – ५०: ५०

उद्दिष्ट:- ग्रामीण भागातील दारिद्र्य दुर करणे.

🅾दारिद्र्य रेषेखालील कुटूंब म्हणजे ज्या कुटूंबाचे वार्षीक उत्पन्न २० हजार रु. पेक्षा कमी आहे.

🅾दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाला दारिद्र्य रेषेच्यावर आणण्यासाठी या योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.

🅾अशा कुटूंबामध्ये अल्प भूधारक, भूमिहीन शेतमजूर, ग्रामीण कारागीर यांचा समावेश करण्यात आला.

१ एप्रिल १९९९ पासून हा कार्यक्रम सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत विलीन करण्यात आला.

३)    ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना / Training for Rural Youth for Self Employment / TRYSEM – योजनेची सुरुवात झाली – १५ ऑगस्ट १९७९.

🅾उद्दिष्टे :- ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारातून रोजागार निर्मितीसाठी

🅾योजनेचे स्वरुप:-

१)    ही योजना १८ ते ३५ वयोगटातील ग्रामीण युवकांसाठी होती.

२)    एक ते सहा महिने या अल्प कालावधी प्रशिक्षण दिले जाई.

३)    बँकेमार्फत १० हजार रुपयांपर्यत कर्ज मिळवून देण्यात येत होते.

४)    प्रशिक्षण कालावधीत लाभार्थींना काही विद्यावेतन देण्यात येई.

१ एप्रिल १९९९ पासून ही योजना सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत विलीन करण्यात आली.

४.सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार / SGSY:-

🅾सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना हा एक नवा व्यापक रोजगार कार्यक्रम आहे.

🅾हा कार्यक्रम १ एप्रिल १९९९ ला सुरु झाला.

🅾खर्चाचे प्रमाण – केंद्र आणि राज्य सरकारद्वारे ७५:२५ प्रमाणात केला जातो.

उद्देश:– गावात राहणा-या गरीब व्यक्तीचे उत्पन्न वाढविणे.

🅾नियोजन आयोगाने दारिद्र्य निर्मुलनाच्या व रोजगार निर्मितीच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी नियोजन आयोगाचे एक सदस्य प्रा. हश्मी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने दारिद्र्य निर्मुलन व रोजगार निर्मितीच्या योजनांमध्ये एक सुत्रता आणण्यासाठी या सर्व योजना एकाच स्वयंरोजगार योजनेत विलीन करण्याची शिफारस केली. ही शिफारस स्वीकारुन सरकारने १ एप्रिल १९९९ पासून सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगार योजना सुरु केली. त्यामध्ये पुढील योजना समाविष्ट करण्यात आल्या.

१.     एकात्मिक ग्रामीण विकास योजना (IRDP)

२.     ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना (TRYSEM)

३.     ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास (DWCRA)

४.     ग्रामीण कारागीरांना सुधारीत अवजारे पुरविणे (SITRA)

५.     गंगा कल्याण योजना (GKY)

६.     दशलक्ष विहीरी योजना (MWS)

अंमलबजावणी– ही योजना जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी द्वारे पंचायत समितीच्या माध्यमातून राबविली जाते.

५)    राष्ट्रीय वृध्दकाळ पेन्शन योजना (NOAPC)

🧩उद्देश:– ज्यांना स्वतःचे नियमित उत्पन्न नाही किंवा ज्यांना कुटुंबाच्या सदस्यांकडून किंवा अन्य कोणत्या मार्गाने आर्थिक सहाय्य मिळत नाही व कोणत्याही आस-या शिवाय जीवन जगत आहेत अशा वृध्दांना आर्थिक मदत करणे.

🧩वैशिष्ट्ये:–

१.     अर्जदाराचे वय ६५ वर्षा पेक्षा अधिक असावे.

२.     प्रत्येक महिन्याला लाभार्थीला २०० रु. पेन्शन दिले जाईल. राज्य सरकार आपल्या साधनातून आणखी काही रक्कम टाकून यात भर घालु शकते.

६५ वर्षावरील ४४ लक्ष निराधार व्यक्तींना सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यात आली.

६)    राष्ट्रीय परिवार सहाय्य योजना (NFBS):-

कमावणा-या, कर्त्याचा मृत्यू झाल्यास १० हजार रु. सहाय्य करण्यात येईल.

पात्रता- कर्त्याचे वय १८ ते ६५ वर्ष असावे.

७) अन्नपुर्णा योजना:– १ एप्रिल २००० पासून सुरु झाली.

🅾उद्देश – वृध्द लोकांची गरज पुर्ण करण्यासाठी अन्नाची सुरक्षा देणे.

🅾अन्नपुर्णा योजने खालील लाभार्थीला दर महिन्याला १०किलो अन्नधान्य (गहु, तांदूळ) मोफत दिले जाईल.

पात्रता –१) अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असले पाहिजे.

२)आश्रयहीन, उत्पन्नाचे अजिबात साधन नसणारे.

३)अर्जदार पुर्वीपासून राष्ट्रीय वृध्दकाळ पेन्शन योजना किंवा राज्य पेन्शन योजनेची पेन्शन घेत नसावा.

८) रोजगार हमी योजना:–

🅾महाराष्ट्राची रोजगार हमी योजना – रोजगार हमी योजना वि. स. पागे यांच्या शिफारशीवरुन प्रायोगिक तत्वावर १९६५ ला तासगाव (सांगली) येथे राबविली

रुपयाचे अवमूल्यन


(Devaluation of Rupee) :-

अवमूल्यनाचा अर्थ : रुपया परकीय चालनाच्या संदर्भात मागणी व पुरवठ्याच्या आधारे स्वस्त होत असल्यास आपण रुपया घसरत आहे, (Rupee is depreciating) असे म्हणतो.

अवमूल्यनामुळे सुद्धा रुपया परकीय चलनाच्या संदर्भात स्वस्त होत असतो.

मात्र अवमूल्यन सरकारने मुद्दाम घडवून आणलेले असते. अवमूल्यनाव्दारे रुपयाची किंमत परकीय चलनाच्या संदर्भात कमी करणे हा सरकारचा किंवा मध्यवर्ती बँकेचा (RBI) धोरणात्मक निर्णय असतो.

तिसरे अवमूल्यन, 1991 –:

जुलै 1991 मध्ये रुपयाचे अवमूल्यन तीन टप्प्यांमध्ये जगातील महत्वाच्या चलनांच्या संदर्भात (डॉलर, पाउंड, मार्क, येन, फ्रँक इ.) घडवून आणण्यात आले.

i) 1 जुलैला 9.5 टक्क्यांनी.

ii) 3 जुलैला 10 ते 10.78 टक्क्यांनी.

iii) 15 जुलैला 2 टक्क्यांनी. तिन्ही टप्पे मिळून रुपयाचे अवमूल्यन सुमारे 20 टक्क्यांनी झाले.

तत्कालीन वित्तमंत्री – डॉ. मनमोहनसिंग.

अवमूल्यनाचे परिणाम :-

1) आयतीवरील परिणाम : अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत भारतात वाढते. आयात महाग झाल्याने आयातदरांची आयातीची प्रवृत्ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्याची परिस्थिती निर्माण होते.

 

2) निर्यातीवरील परिणाम : अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. भारतीय वस्तु परदेशात स्वस्त वाटायला लागल्याने परकीय आयातदार भारतीय वस्तूंची अधिक मागणी करायला लागतात. त्यामुळे भारताची निर्यात वाढण्याची परिस्थिती निर्माण होते.

 आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) कडून सोने खरेदी :-

सप्टेंबर 2009 मध्ये IMF ने आपले वित्तीय संसाधने वाढविण्यासाठी (कमी उत्पन्न गटातील देशांना अधिक मदत करता यावी यासाठी) 403.3 टन सोने विकण्याचा निर्णय घोषित केला.

त्यानुसार रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2009 मध्ये 6.7 अब्ज डॉलर्स खर्च करून 200 टन सोने खरेदी केले. त्यामुळे भारताच्या परकीय चलन साठयातील सोन्याचे प्रमाण 357.7 टनाहून 557.7 टनापर्यंत (एकूण साठयापैकी 6 टक्के) वाढले.

तसेच त्याबरोबर भारत जगातील 10 व्या क्रमांकाचा सरकारी सोने धारण करणारा देश (official gold-holding country) बनला.

दुसरे अवमूल्यन, 1966 –

6 जून 1966 रोजी रुपयाचे अवमूल्यन अमेरिकन डॉलर व इतर हार्ड यूरोपियन चलनांच्या संदर्भात 36.5 टक्क्यांनी घडवून आणण्यात आले.

या अवमूल्यनामुळे रुपयाचा विनिमय दर 4.76 रुपये प्रती डॉलर वरून 7.50 रुपये प्रती डॉलर असा कमी झाला.

तसेच एका रुपयाची सोन्यातील किंमत 0.186621 ग्रॅम्स वरून 0.118489 ग्रॅम्स पर्यंत कमी झाली.

या अवमूल्यनाची उद्दिष्टे –

1) भारताची हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे.

 

2) भारताची निर्यात वाढविणे.

 

3) भारताचा व्यापारतोल कमी करणे.

 

अवमूल्यनामुळे भारताची निर्यात वाढली मात्र दुष्काळी वर्षामुळे अन्नधान्याची आयात करावी लागल्याने व्यापार तूट अपेक्षेप्रमाणे कमी झाली नाही.

तत्कालीन अर्थमंत्री – सचिव चौधरी

अवमूल्यनाचे प्रयोग :

स्वातंत्र्यप्राप्तिनंतर रुपयाचे तीन वेळा अवमूल्यन घडवून आणण्यात आले होते.

पहिले अवमूल्यन, 1949 –

26 सप्टेंबर 1949 या दिवशी रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5 टक्क्यांनी अवमूल्यन घडवून आणण्यात आले. पाउंड स्टर्लिंगच्या संदर्भात हे अवमूल्यन घडवून आणण्यात आले नाही.

अवमूल्यनामुळे एका रुपयाची डॉलरमधील किंमत 30.2 सेंटस वरुन 21 सेंटस पर्यंत कमी झाली. तसेच एका रुपयाची सोन्यातील किंमत 0268601 ग्रॅम्स वरून 0.186621 ग्रॅम्स पर्यंत कमी झाली.

अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तुट कमी झाली. 1948-49 मध्ये 185.1 कोटी रुपये असलेली व्यापार तूट 1949-50 मध्ये 141.9 कोटी तर 1950-51 मध्ये 49.6 कोटी रुपये एवढी कमी झाली. मात्र हा अनुकूल परिणाम फार काळ टिकला नाही. 1951-52 मध्ये तूट वाढून 237.1 कोटी रुपये झाली.

तत्कालीन अर्थमंत्री – जॉन मथाई

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.

🔹उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.

🔹उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

🔹विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.

🔹अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.

🔹रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

🔹स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

• विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात.
• पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला अक्षवृत्त म्हणतात. एकूण 181 अक्षवृत्त आहेत.
• आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास रेखावृत्त म्हणतात. ती एकूण 360 आहेत.
• शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय.

• पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात.
• पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास परिभ्रमण म्हणतात.
• पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
• नकाशात हिरवा रंग वनक्षेत्रासाठी वापरतात.
• भारताची प्रमाणवेळ ही 82.30 पूर्व रेखावृत्तावरून ठरते. हे रेखावृत्त मिर्झापूर (उ. प्र.) वरून ठरते.
• तपांबर- पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात. याचा विस्तार 13 किमी आहे. वादळे, ढग, पाऊस इ.ची निर्मिती होते.
• वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबरात आढळते.
• संदेशवहनासाठी आयनांबर या थराचा उपयोग होतो.
• इंदिरा पॉंईट हे भारताचे सर्वात शेवटचे टोक आहे.
• क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात 7 वा क्रमांक आहे.
• मुख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास 7517 किमी लांबीचा सागर किनारा लाभला आहे.
• भारताच्या वायव्येस पाकिस्तान व आफगाणिस्तान, उत्तरेस- चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस- म्यानमार व बांग्लादेश आहेत.
• क्षेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्यप्रदेश व तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो.
• गोवा या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे.
• भारताच्या तिन्ही बाजूस पाणी असल्याने त्यास द्वीपकल्प म्हणतात.
• कांचनगंगा हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर तर, k2(गॉडवीन ऑस्टीन 8611 मी. ) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे.
• दक्षिण भारतीय पठारास दख्खनचे पठार असे म्हणतात.
• अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.

संकीर्ण भूगोल

१]  सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते. – उदयपूर

२]पश्चिम बंगालमधील सिंगनूर येथून ‘नॅनो’ कारचे उत्पादन गुजरात येथील मधील कोणत्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. सानंद

३] ‘मुर’ बेटावरून कोणत्या दोन देशांदरम्यान वाद चालू आहे ? भारत – बांगलादेश

४]भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूंनी वेगवेगळ्या समुद्रांनी वेढलेला
आहे त्यास काय म्हणतात ?

भारतीय द्वीपकल्प

५] जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट ‘माजोली’ हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे ? ब्रह्मपुत्रा

६]‘नोकरेक’ जैविक आरक्षण क्षेत्र कोठे आहे ? मेघालय

७]भारतातील प्रमुख अवकाशयान उड्डाण केंद्र कुठे आहे ? श्रीहरीकोटा

८] कोणत्या नदीच्या प्रवाहात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते ? कावेरी

९]जगातील सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे. पेराना

१०] भारतातील सर्वात मोठा सिंचन कालवा कोणता ? इंदिरा गांधी कालवा

११] कोणत्या प्रमुख पिकांच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो? आंबा, केळी, अंगूर,

१2] जगातील आंबा उत्पादनापैकी किती टक्के आंब्याचे उत्पादन भारतात होते. ३९ %

१३] जगात फुलगोबीच्या उत्पादनात भारतात प्रथम क्रमांक, कांद्याच्या उत्पादनात दुसरा तर पत्तागोबीच्या उत्पादनात कोणता क्रमांक लागतो. तिसरा

१४] भारत …. यांच्या उत्पादनात व उपभोगत जगात प्रथम क्रमांकावर आहे. काजू

१५] दुधाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक आहे तर अंड्याच्या उत्पदनात त्याचा जगात कितवा नंबर लागतो. पाचवा

१६] कोंबड्यांना होणारा बर्ड फ्ल्यू म्हणजेच …… हा रोग आहे ? एविअन एन्फ्ल्यूएंजा

१७] सध्या भारतात प्रतिदिन, प्रतिव्यक्ती दुधाची उपलब्धता किती आहे ? २३१ ग्रॅम

१८] सध्या भारतात कोणत्या पाण्यातील मासेमारीचे प्रमाण सार्वधिक आहे. गोड्या पाण्यातील

१९] गोपनाथ सागर किनारा कोठे आहे ? गुजरात

२०] पाचव्या आर्थिक गणनेनुसार सार्वधिक उद्योग कोणत्या राज्यात आहेत ? तामिळनाडू ( ४४. ४७ लाख )
( दुसरा – महाराष्ट्र ४३.७५ लाख )

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...