Thursday, 27 January 2022

यंदा सलग दुसऱ्या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प होणार ‘पेपरलेस’; करोनामुळे सरकारचा निर्णय.

🔰यदा सलग दुसऱ्या वर्षी, वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प यावर्षी ‘पेपरलेस’ होणार आहे. करोनामुळे कामाच्या ताणामुळे तसेच सुरक्षिततेच्या कारणांमुळे सरकारने बजेटच्या प्रती छापणे टाळण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकृत सूत्राने फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले. त्यामुळे बजेट डिजिटल स्वरूपात उपलब्ध करवून दिले जाईल आणि फक्त काही हार्ड कॉपी छापल्या जाणार आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.


🔰अर्थसंकल्प सादर होईपर्यंत १०० हून अधिक लोकांना साधारणपणे पंधरा दिवस नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात (ज्यामध्ये वित्त मंत्रालय आहे) प्रिंटिंग प्रेसमध्ये राहावे लागते. सध्या करोनाचं संक्रमण होण्याची भीती आहे, त्यामुळे अर्थसंकल्प न छापण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतंत्र भारतात प्रथमच, गेल्या वर्षी सरकारला अर्थसंकल्प छापण्याची ही प्रथा थांबवावी लागली. प्रिंटिंग प्रेसमध्ये जागा कमी असते आणि कामसाठी १०० पेक्षा जास्त लोक लागतात, त्यामुळे सुरक्षित अंतर राखणं कठीण असतं. 


🔰महणजेच १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण जेव्हा अर्थसंकल्प मांडतील. त्या दिवशी संसदेच्या परिसरात या वेळी बजेट पेपरने भरलेले ट्रक दिसणार नाहीत. यापूर्वी सरकारने २०१६-१७ मध्ये अर्थसंकल्पाच्या हार्ड कॉपीची छपाई कमी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु गेल्या वर्षी प्रथमच छपाई पूर्णपणे थांबवली.


🔰सरकारने सुरुवातीला पत्रकार आणि विश्लेषकांना वितरित केलेल्या प्रतींची संख्या कमी केली होती आणि नंतर खासदारांना उपलब्ध केलेल्या प्रती कमी केल्या होत्या. त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी बजेट पेपरलेस सादर केलं जाणार आहे.

2022 च्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून खालील पाच मध्य आशियाई देशांना आमंत्रित....


1) उज्बेकिस्तान

2) तुर्कमेनिस्तान

3) तजिकिस्तान

4) कझाकिस्तान

5) किर्गिस्तान


🔰 2021 प्रमुख पाहुणे - बोरिस जॉन्सन (ब्रिटन)


🔰 2020 प्रमुख पाहुणे - जैर बोल्स्नारो (ब्राझील)


🔰 2019 प्रमुख पाहुणे - सिरिल रामाफोसा ( द. आफ्रिका )



भारतात युरोपियनाचे आगमन


 1⃣पोर्तुगीज


↪️ वास्को द गामा कालिकत या बंदरात 20 मे 1498 रोजी उतरला, 1499 मध्ये त्याच्या खर्चाच्या 60 पट किमतीचा माल घेऊन गेला.


↪️1502 तो भारतात परत आला.यावेळी तो अधिक जहाजे घेऊन आला. त्याने कालिकत, कोचीन व कन्नोर येथे व्यापारी केंद्रे स्थापली.


↪️1505  फ्रान्सिस्को डी अल्मेडा भारतातील 1st पोर्तुगीज गव्हर्नर नेमणूक


↪️1509 ला अल्फान्सो डी अल्बुकर्क हा 2nd गव्हर्नर. त्याने १५१०-आदिलशाहकडून गोवा जिंकले.त्याने आपल्या देशातील पुरुषांना भारतीय महिलांशी विवाह करण्यास प्रोत्साहित केले.व मुस्लिमांचा छळ केला.


↪️कार्टाझ ( Cartazes) प्रणाली (जहाजांना दिलेले एक संरक्षणाचे पत्र ) पोर्तुगीजांनी सुरू केली


↪️मार्टिन अल्फान्सो डी सूझा (गव्हर्नर 1542-45)यांच्यासोबत प्रसिद्ध जेस्युट संत फ्रान्सिस्को झेवियर भारतात आले.

गृह मंत्रालयाने पद्म पुरस्कार 2022 जाहीर.



🔸कद्रीय गृह मंत्रालयाने देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. 


🔹परस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात: 

१)पद्मविभूषण (अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी)

२)पद्मभूषण (उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवा)

३)पद्मश्री (विशिष्ट सेवा). 


🔸ह पुरस्कार राष्ट्रपती भवनात दरवर्षी साधारणपणे मार्च/एप्रिलच्या आसपास आयोजित केलेल्या समारंभात भारताच्या राष्ट्रपतींद्वारे प्रदान केले जातात . 


🔹यावर्षी राष्ट्रपतींनी खाली दिलेल्या यादीनुसार 2 जोडी प्रकरणांसह 128 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली आहे (दोन प्रकरणात, पुरस्कार एक म्हणून गणला जातो). 


🔸या यादीत 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. 


🔹परस्कार विजेत्यांपैकी 34 महिला आहेत आणि या यादीमध्ये परदेशी/NRI/PIO/OCI या श्रेणीतील 10 व्यक्ती आणि 13 मरणोत्तर पुरस्कारप्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे. 


🔸Duo बाबतीत, पुरस्कार एक म्हणून गणला जातो.


20 महत्त्वाचे अंकगणित सराव प्रश्न उत्तरे

1. 67×70+67×30=?

 870

 6700

 670

 430

उत्तर :6700

 2. 9999-8888+(7777-6666)=?

 1111

 2222

 33333

 4444

उत्तर :2222

 3. राजूची 5 विषयांची सरासरी 58 आहे त्यापैकी पहिल्या 3 विषयांची सरासरी 55 असून शेवटच्या विषयांचे गुण 62 आहेत. तर राजुला चौथ्या विषयात किती गुण मिळाले?

 62

 55

 58

 63

उत्तर :63

 4. एक स्त्री व तिच्या 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे आहे, जर स्त्रीचे वय विचारात घेतले नाही तर मुलांचे सरासरी वय 9 येते म्हणजे स्त्रीचे वय किती?

 45

 47

 90

 81

उत्तर :45

 5. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार पाडते. तर त्या आगगाडीची लांबी किती?

 100 मीटर

 200 मीटर

 300 मीटर

 400 मीटर

उत्तर :200 मीटर

 6. 1000 चे 15% =?

 120

 220

 150

 210

उत्तर :150

 7. 825 चे 4% =?

 33

 36

 38

 40

उत्तर :33

 8. राजचे मासिक उत्पन्न 15,000 रुपये आहे त्यातील 9,000 रुपये तो खर्च करतो तर राज उत्पन्नाच्या शेकडा किती बचत करतो?

 40%

 60%

 65%

 35%

उत्तर :40%

 9. जर एका दोरीचा 22% हिस्सा 33 मीटर आहे, तर दोरीची एकूण लांबी किती?

 100 मीटर

 120 मीटर

 150 मीटर

 300 मीटर

उत्तर :150 मीटर

 10. अजित हा 15% इंधनावर, 20% घरभाड्यावर, 50% किराणा मालावर आणि उर्वरित मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो जर तो शिक्षणावर 9,000 रुपये खर्च करीत असेल तर त्याला घरभाडे किती?

 12,000

 19,000

 40,000

 60,000

उत्तर :60,000

 11. एका घड्याळाची विक्री किंमत 10,800 रुपये आहे तेंव्हा त्यास 25% तोटा होतो तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती?

 12,400

 13,400

 14,400

 15,400

उत्तर :14,400

 12. जर 15 रुपयात 192 आंबे येतात तर ह रुपयात किती आंबे येतील?

 54

 64

 44

 74

उत्तर :64

 13. 4 : 64 :: 2 : ?

 4

 8

 12  

 16

उत्तर :8

 14. 216 : 6 :: 343 : ?

 7

 8

 9

10

उत्तर :7

 15. विसंगत घटक ओळखा.

 1,4,8,16,25

 1

 8

 16

 25

उत्तर :8

 16. JACK=25, JILL=43 तर CROWN=?

 73

 72

 71

 70

उत्तर :73

 17. जर D=4 आणि COVER=63 असेल तर BASIS=?

 49

 50

 54

 55

उत्तर :50

 18. माझ्या बायकोच्या आईची एकुलती एक मुलगी ही माझी कोण आहे?

 पुतणी

 मेहुणी

 बायको

 यापैकी नाही

उत्तर :बायको

 19. 96×96+4=?

 9640

 8800

 9600

 9800

उत्तर :9600

 20. 1510.5+410.5+10.5=?

 1931.5

 193.15

 19315

 19.315

उत्तर :1931.5

स्पर्धा परीक्षा किंवा अनेक नौकरी साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घड्याळावर अनेकदा प्रश्न विचारतात त्या साठी काही सुञ आज आपण पाहू या.

🔵 घटक  - घड्याळ  🔵

🚦  सुञ :-

1) वेळ दिली असता कोन काढणे.
      11
= --------- × M    -  30 × H
       2

M  - मिनीट
H  - दिलेल्या वेळेत एकूण किती तास आहेत.

2 )  समजा 7 ते 8 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा एकमेकावर येतात.....

सुञ...
       60 
=   -----------  ×  7 × 5
        55

3)  दिवसात किती वेळा तास व मिनीट काटा 90° चा कोन करतात  ??

उत्तर  -  12 तासात  -  22 वेळा.
            24 तासात  - 44 वेळा.

4) दिवसात किती वेळा तास काटा व मिनीट काटा परस्परांशी विरूद्ध असतात /येतात  ?

उत्तर  - 
     12 तासात    -  11 वेळा
     24 तासात    -  22 वेळा.

5 ) एक मिनीट म्हणजे   6° होय.
एक तास म्हणजे  90° होय.

6 ) प्रत्येक तासाला तितकेच ठोके पडत असतील तर दिवसात एकूण ठोके किती पडतात ?
      12  × 13 
=  ----------------   = 78.....12 तासात.
            2  

24 तासात एकूण ठोल   - 156

7 )  4 ते 5 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा विरुद्ध दिशेला असतील ?

स्पष्टीकरण  -
या वेळी मिनीट काटा 10 ते 11 च्या दरम्यान असेल म्हणून ...
M = 10 घ्यावे .

      60
=  --------- ×  5 × M
       55

       60  
=  -----------  × 5 × 10  
       55
      600               6
= -----------   = 54 ------
       11                11

                                  6
म्हणजे च  4 वाजून 54 ----- मिनीट.
                                  11                     

8)  5 ते 6 च्या दरम्यान किती वाजता 90 ° चा कोन होईल ?
स्पष्टीकरण  -

90 ° चा कोन होण्यासाठी मिनीट काटा 8 च्या पुढे असाला पाहीजे.
म्हणून  M = 8 घ्यावे .
       60 
  =  ------- × 5 × 8
        55

        480                7
=  -------------  = 43 ------
         11                 11

म्हणून ...                         7
90° चा कोन 5 वाजून 43 ----- मिनीट.
                                     11

📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

शाश्वत विकास १७ ध्येये

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.

 २. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.

३. आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.

४. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.

५. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.

६. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.

७. सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.

८. शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.

९.पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.

१०. विविध देशांमधील असमानता दूर करणे.

११. शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.

१२. उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.

१३. हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.

१४. महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.

१५.परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.

१६. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.

१७. चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

जाणून घेऊया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जलविषयक भूमिका....


● डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्‍पकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.

● कायदा, समाजशास्‍त्र, मानववंशशास्‍त्र आणि राज्‍यशास्‍त्र अशा अनेक क्षेत्रांत त्‍यांनी बहुमोल कामगिरी बजावली आहे.

● देशाच्‍या आर्थिक आणि जलधोरणातही त्‍यांची मोठी भूमिका आहे.

● देशाची जलनीती, दामोदर  खोरे प्रकल्‍प, हिराकुंड धरण, सोननदी प्रकल्‍प कार्यान्वित करण्‍यासाठी त्‍यांचे योगदान उल्‍लेखनीय व महत्त्वपूर्ण आहे.

● सध्‍याच्‍या राष्‍ट्रीय नदीजोड प्रकल्‍पाची कल्‍पना बाबासाहेबांनी 1942 ते 1945 दरम्‍यान मांडली होती.

● 20 जुलै, 1942 रोजी डॉ.आंबेडकरांनी मजूर मंत्री म्‍हणून सूत्रे हाती घेतली.

● त्‍यांचा व्‍हॉइसरॉय कार्यकारी मंडळाचे सभासद म्‍हणून समावेश करण्‍यात आला आणि त्‍यांच्‍याकडे श्रम, सिंचन व वीज हे विभाग सोपवण्‍यात आले.

● दुसऱ्या महायुध्‍दानंतरचे व्‍यापक आर्थिक विकासाचे धेरण आणि सिंचन व वीज या विषयावर तपशीलवार धोरण तयार करण्‍यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घेतला.

● 1935च्‍या कायद्यानुसार श्रम विभागाने सिंचन आणि वीज विकासासाठी मुख्‍यत्‍वे तीन गोष्‍टी कार्यान्वित करण्‍याचे ठरवले.

● त्‍यामध्‍ये
१) एकापेक्षा दोन राज्‍यांत वाहणाऱ्या नद्यांचे नियंत्रण व व्‍यवस्‍थापन करणे.
२)राज्‍यांमधील नद्यांवर पाणी व जल विद्युत उर्जा संपत्‍ती निश्चित करणे
३)शासकीय व तांत्रिक विकास करण्‍यासाठी राष्‍ट्रीय सिंचन धोरण काय असावे या गोष्‍टींचा समावेश होता.

● पाण्‍यासंबंधी घटनात्‍मक तरतुदी
डॉ. आंबेडकरांनी घटनेचा आराखडा घटना समितीस सादर करताना पाणी हा विषय केंद्र शासनाच्‍या अख्‍त्‍यारीत असावा, अशी भूमिका मांडली.

● भारतीय राज्‍यघटनेत पाणी हा विषय क्रमांक 56 मध्‍ये अंतर्भूत होऊन केंद्र शासनालाही यासंबंधी कायदे करण्‍याचे अधिकार प्राप्‍त झाले.

● भारताच्‍या राज्‍यघटनेत ही तरतूद कलम २६२ मध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आली आहे.

● कलम २६२ अंतर्गत 'आंतरराज्‍यीय जल‍विवाद कायदा' व 'नदीखोर प्राधिकरण कायदा 1956' पारित करण्‍यात आला.  

● पुराच्‍या पाण्‍याचा विनियोग करा
नोव्‍हेंबर 1945 मध्‍ये कटक येथे झालेल्‍या परिषदेत डॉ. आंबेडकरांनी अत्‍यंत मौलिक विचार देशाला दिले आहेत.

● 'पाणी आणि महापूर हे विनाशकारी आहेत, असे गृहीत धरु नका. देशामध्‍ये एवढे पाणी उपलब्‍धच नाही की जे हा‍निकारक ठरु शकेल.

● भारतीय जनतेला पाण्‍याच्‍या कमतरतेमुळे जास्‍ट कष्‍ट सोसावे लागतात, जास्‍त पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेमुळे नाही.

● पाणी राष्‍ट्रीय संपदा असल्‍यामुळे आणि पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्‍याचे प्रमाण असमतोल आणि अविश्‍वासार्ह असल्‍यामुळे पुराच्‍या जास्‍त पाण्‍याविषयी तक्रार करण्‍यापेक्षा या पुराच्‍या पाण्‍याचा मनुष्‍याच्‍या विकासासाठी धरणे बांधून कसा उपयोग करता येर्इल, हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे.

● त्‍यासाठी जेथे पुरामुळे नेहमी नुकसान होत असते त्‍या नद्यांवर ठिकठिकाणी धरणे बांधून हे पाणी समुद्राला जाऊ न देता विकासासाठी वापरणेच इष्‍ट ठरेल.' असे विचार त्‍यांनी मांडले होते.

● हिरांकुड धरण प्रकल्‍प
केंद्रीय जलमार्ग, पाटबंधारे, नौकायन आयोगाचे अध्‍यक्ष ए.एन. खोसला यांनी महानदीवरील बहुद्देशीय विकास प्रस्‍तावावर डॉ. आंबेडकरांशी चर्चा करुन हिराकुंड धरणाची अंमलबजावणी केली.

भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना.

🅾 वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पडतात.

1. भारतीय नाणे बाजार -

🅾वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला नाणे बाजार असे म्हणतात.

🅾 नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र, कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

🅾भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच, संघटित क्षेत्राचा समावेश होतो.

🅾असंघटित क्षेत्रात सावकार, सराफी पेढीवाले तसेच, बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो.

🅾 संघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.

2. भारतीय भांडवल बाजार -

🅾 वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात.

🅾 भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते.

🅾 भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्‍या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्‍या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो.

1. व्यापारी बँका

2. विकास वित्तीय संस्था. उदा. IFCI, IDBI, ICICI, SFCs, SIDCs, इ.

3. विकास कंपन्या - LIC आणि GIC.

4. मर्चंट बँका.

5. म्युचुअल फंड्स - UTI

6. पतदर्जा ठरविणार्‍या संस्था CRISIL, CARE, ICRA

🅾तसेच, भांडवल बाजारात कर्ज घेणार्‍यांना (ऋणको) व कर्ज देणार्‍यांना (धनको) एकत्र आणणारे रोखे बाजार (Stock exchanges) व त्यातील दलाल महत्वाची भूमिका पार पाडतात.

🅾भारतात बँक व्यवसायाचे अस्तित्व प्राचीन काळापासूनच असले तरी आधुनिक बँक-व्यवसाय मात्र ब्रिटिश काळापासूनच सुरू झाला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

ENGLISH PHRASAL VERBS

1.Hold up - Wait or delay ( थांबणे किंवा विलंब करणे)

2.Keep away - Prevent from coming near (जवळ येण्यापासून थांबवणे)

3.Keep up - Stay ahead (प्रयत्न चालु ठेवणे ,पुढे जात राहणे)

4.Kick out - Stop, stall, or disconnect suddenly (अचानकपणे  थांबणे किंवा बंद होणे)

5.Kick off - Start; to launch (नवीन सुरुवात करणे)

6.Knock out -  Exhaust (  थकविणे किंवा दमविणे)

7.Lay down - Put something down or stop using ( खाली टाकून देणे किंवा वापरणे बंद करणे)

8.Hold out - Survive, endure ( जगणे, सहन करणे )

9.Let down - Allow to descend (खाली उत्तर देणे)

10Let out - Release/Disclose (प्रस्तुत किंवा उघड करणे)

11.Look after - Watch or protect; to
keep safe/ to take care of (काळजी घेणे /एखाद्याचे संरक्षण करणे)

12.Look around -  Search a place (एखाद्या ठिकाणी शोधणे किंवा ठावठिकाणा शोधणे)

13.Look at - Consider (समजणे ,विचारात घेणे)

14.Look for - Search for; to seek (शोधणे, एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करणे)

16.Look into - Investigate, explore, or consider (चौकशी करणे एखादी गोष्ट धुंडाळून काढणे)

English grammar Tenses Exercise

Fill in the blanks with an appropriate tense form.

☘️🍄☘️🍄☘️🍄☘️🍄☘️🍄☘️🍄☘️

1. I ……………….. for Tokyo tomorrow morning.

a) am leaving
b) will leave
c) leave

2. Rani ……………….. a baby.

a) expects
b) is expecting
c) has expected

3. If you ……………… the answer why didn’t you tell me?

a) know
b) knew
c) have known

4. You have never …………………. me any help.

a) offer
b) offered
c) offering

5. She ……………… like that since childhood.

a) was
b) has been
c) is

6. The spider ……………….. with a stone.

a) killed
b) was killed
c) has killed

7. The parcel ………………. in the morning.

a) sent
b) was sent
c) send

8. What are you ……………….. there?

a) done
b) doing
c) do

9. The winners ……………….. by the principal.

a) were praising
b) were praised
c) praised

10. The train ……………….. at 6.30.

a) leaves
b) leave
c) is leaving

Answers
▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬▭▬

1. I am leaving for Tokyo tomorrow morning.

2. Rani is expecting a baby.

3. If you knew the answer why didn’t you tell me?

4. You have never offered me any help.

5. She has been like that since childhood.

6. The spider was killed with a stone.

7. The parcel was sent in the morning.

8. What are you doing there?

9. The winners were praised by the principal.

10. The train leaves at 6.30.

महाराष्ट्राच्या सीमेला स्पर्श करणारी राज्ये व त्यांचे स्थान


____________________________
🔴 राज्य – गुजरात  

◆स्थान – महाराष्ट्राच्या वायव्येस

◆स्पर्श करणारे जिल्हे – पालघर, नाशिक व धुळे.
____________________________
🟠  राज्य – मध्यप्रदेश

◆स्थान – महाराष्ट्राच्या उत्तरेस

◆स्पर्श करणारे जिल्हे – धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर व भंडारा.
____________________________
🟣 राज्य – छत्तीसगढ

◆स्थान – महाराष्ट्राच्या पूर्वेस

◆स्पर्श करणारे जिल्हे – भंडारा व गडचिरोली.
____________________________
🔵 राज्य – तेलंगणा  

◆स्थान – महाराष्ट्राच्या आग्येयस

◆स्पर्श करणारे जिल्हे – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड.
____________________________
🟢. राज्य – कर्नाटक  

◆स्थान – महाराष्ट्राच्या दक्षिणेस

◆स्पर्श करणारे जिल्हे – नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर व सिंधुदुर्.
____________________________
🟡. राज्य – गोवा

◆स्थान – महाराष्ट्राच्या नैऋत्येस

◆स्पर्श करणारे जिल्हे – सिंधुदुर्ग

____________________________

स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त महत्वपूर्ण सराव प्रश्नावली स्पष्टीकरण

विषय : महाराष्ट्राचा भूगोल

प्र.१) महाराष्ट्र राज्यातील येलदरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अ) पुणे
ब) परभणी ✅
क) औरंगाबाद
ड) सोलापूर

स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात येलदरी हे धरण आहे.

प्र.२) भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते ?
अ) राजस्थान
ब) मध्ये प्रदेश
क) राजस्थान ✅
ड) कर्नाटक

स्पष्टीकरण : भारतातील आकारमानाने राजस्थान राज्य सर्वात मोठे आहे.

 जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे.

क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो.

येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे

प्र.3) जोड्या लावा.

   जिल्हा         साखर कारखाना
अ) बीड - I) तुळशीदास नगर
ब) अहमदनगर - II) व्रध्देश्वर
क) सोलापूर   - III) कडा
ड) कोल्हापूर   - IV) हलकर्णी

अ) (IV) (III) (II) (I)
ब) (II) (I) (III) (IV)
क) (III) (II) (I) (IV) ✅
ड) (III) (IV) (II) (I)

स्पष्टीकरण : अ) बीड - III) कडा
ब) अहमदनगर - II) व्रध्देश्वर
क) सोलापूर   - III) तुळशीदास नगर
ड) कोल्हापूर   - IV) हलकर्णी

प्र.४) - - - - - - - - - - - वर्षी लातूर येथे तर - - - - - - - - वर्षी कोयना येथे भूकंप झाले.

अ) १९९३, १९६७ ✅
ब) १९८३, २००१
क) २००१, २००९
ड) १९९९, १९६६

स्पष्टीकरण : १९९३ वर्षी लातूर येथे तर वर्षी १९६७ कोयना येथे भूकंप झाले.

प्र.५) महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा.

    तालुके               जिल्हे
अ) खेड      I) रायगड, अहमदनगर
ब) कर्जत     II) रत्नागिरी, पुणे
क) कळंब    III) नाशिक, अमरावती
ड) नंदगाव   IV) उस्मानाबाद, यवतमाळ

अ) (II) (IV) (I) (III)
ब) I) (II) (IV) (III)
क) (II) (I) (IV) (III) ✅
ड) (IV) (III) (II) (I)

स्पष्टीकरण : अ) खेड - II) रत्नागिरी, पुणे
ब) कर्जत - I) रायगड, अहमदनगर
क) कळंब - IV) उस्मानाबाद, यवतमाळ
ड) नंदगाव - III) नाशिक, अमरावती

प्र.६) भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग - - - - - - - शहरात बांधण्यात आला.

अ) मुंबई
ब) दिल्ली
क) चेन्नई
ड) कोलकाता ✅

स्पष्टीकरण : भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग कोलकाता शहरात बांधण्यात आला.

प्र.७) गोदावरी नदी महाराष्ट्रातील - - - - - - - - - येथून उगम पावते.

अ) भीमाशंकर
ब) मुलताई
क) त्र्यंबकेश्वर ✅
ड) महाबळेश्वर

स्पष्टीकरण : गोदावरी नदी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील एक देवस्थान आहे.

प्र.८) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सिंचन पध्दत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

अ) ठिबक सिंचन पध्दती
ब) मोकाट सिंचन पध्दती ✅
क) उपसा सिंचन पध्दती
ड) तलाव सिंचन पध्दती

स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील मोकाट सिंचन पध्दती सिंचन पध्दत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

प्र.९) अ) ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर  जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो.
ब) बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पुर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो.

वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?

अ) फक्त अ
ब) फक्त ब
क) अ आणि ब बरोबर ✅
ड) वरीलपैकी एकही नाही.

स्पष्टीकरण : अ) ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो.
ब) बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पुर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो.

वरीलपैकी दोन्ही विधान बरोबर आहेत.

प्र.१०) आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजग्रह कोठे आहे ?

अ) जायकवाडी प्रकल्प
ब) तारापूर प्रकल्प
क) कोयना प्रकल्प ✅
ड) पूर्णा प्रकल्प

स्पष्टीकरण : आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजग्रह कोयना प्रकल्प आहे, हा प्रकल्प कोयना धरणावर बांधला गेला आहे, कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून १९२० MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला

कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे

🔹1. खाडी : भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.

     ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे

मुंबई उपनगर : मालाड, माहीम

मुंबई : माहीम

रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट

रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग

सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल

🔹2. पुळनी : समुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना ‘पुळन’ असे म्हणतात.

मुंबई उपनगर : जिहू बीच

मुंबई शहर

दादर, गिरगाव

रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर

सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा

रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन

🔹3. वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर ‘वाळूचे दांडे’ तयार होतात.

खरदांडा(रायगड)

🔹4. बेटे : मुंबई : मुंबई बेट

रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)

अलिबाग : खांदेरी, उंदेरी

सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)

मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव

🔹5. बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.

मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),

रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,

सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी

🔹6. खनिजे : बॉक्साईट = ठाणे,

म्यंगेणीज = सिंधदुर्ग,

क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व

जिप्सम = रत्नागिरी

🔹7. नद्या : ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,

मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री

दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.

जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्‍यास समांतर. कारण, ‘डोंगरांच्या रांगा’

🔹8. किल्ले : जिल्हे डोंगरी किल्ले व  सागरी किल्ले

ठाणे वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा

रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा

रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग

सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग

भारतगड, पधगड सजैकोत

व्हाइसरॉय घटकांवरील सराव प्रश्न

♦️प्रश्न 1️⃣: कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला-?

१) लॉर्ड कॅनिंग✅✅
२)लॉर्ड मिंटो
३) लॉर्ड डफरीन
४) यापैकी नाही

♦️प्रश्न 2️⃣:कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिटी कोणाच्या काळात स्थापन केली?

१)लॉर्ड कॅनिंग
२) लॉर्ड रिपन
३) लॉर्ड जॉन लॉरेन्स ✅✅
४) लॉर्ड लिटन

♦️प्रश्न 3️⃣:- "रॉयल टायटल ऍक्ट" कोणाच्या काळात संमत करण्यात आला?

१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड हेस्टिंग
३) लॉर्ड लिटन ✅✅
४) यापैकी नाही

♦️प्रश्न 4️⃣:-पहिला फॅक्ट्री ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१)लॉर्ड रिपन ✅✅
२) लॉर्ड लान्सडाऊन
३) लॉर्ड चेम्सफर्ड
४) यापैकी नाही

♦️प्रश्न 5️⃣:-पंजाब टेंनसी ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड डफरिन ✅✅
३) लॉर्ड कानींग
४) लॉर्ड मेयो

♦️प्रश्न 6️⃣:- मणिपूर राज्यच्या कारभारात कोणी हस्तक्षेप केला?

१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड मिंटो
३) लॉर्ड लिटन
४) लॉर्ड लान्सडाऊन✅✅

♦️प्रश्न 7️⃣ :-भारतीय नाणी व चलन कायदा कोणी केला?

१) लॉर्ड कर्झन✅✅
२) लॉर्ड कॉर्नवॉलिस
३) लॉर्ड मेयो
४) लॉर्ड रिपन

♦️प्रश्न 8️⃣:-भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड लिटन
२) लॉर्ड चेम्सफर्ड
३) लॉर्ड कर्झन ✅✅
४) यापैकी नाही

♦️प्रश्र 9️⃣ :- कोणच्या काळात वंगभंग चळवळ घडून आली?

१) लॉर्ड मिंटो
२) लॉर्ड हार्डिंग
३)लॉर्ड कर्झन
४) लॉर्ड मिंटो II ✅✅

♦️प्रश्न १०:- असहकार चळवळ कोणच्या काळात सुरू झाली?

१) लॉर्ड रिडींग ✅✅
२) लॉर्ड होर्डिंग
३) लॉर्ड चेम्सफर्ड
४) यापैकी नाही

                 

पंचायत राज संदर्भातील समित्या

1) व्ही आर राव (1960)
✅विषय - पंचायत सांख्यिकी सुसूत्रता समिती

2) एस डी मिश्रा (1961)
✅विषय - पंचायत राज आणि सहकारी संस्था

3) व्ही ईश्वरण (1961)
✅विषय - पंचायत राज प्रशासन

4) जी आर राजगोपाल (1962)
✅विषय - न्याय पंचायती संदर्भात अभ्यासगट

5) आर आर दिवाकर (1963)
✅विषय - ग्रामसभेसंदर्भात

6) एम राजा रामकृष्णय्या (1963)
✅विषय - पंचायत राज संस्थेच्या अंदाजपत्रक संदर्भात अभ्यासगट

7) के संथानम (1963)
✅विषय - पंचायत राज अर्थविषयक अभ्यास गट

8) के संथानम (1965)
✅विषय - पंचायत राज निवडणूक संदर्भात

9) आर के खन्ना (1965)
✅विषय - पंचायत राज लेखापरीक्षणसंबंधी अभ्यासगट

10) जी रामचंद्रन (1966)
✅विषय - पंचायत राज प्रशिक्षण संदर्भात

11) श्रीमती दया चोबे (1976)
✅विषय - समुदाय विकास आणि पंचायत राज

भारतीय राज्यघटना


पार्श्वभूमी:

दुसरे महायुध्द संपुष्टात आल्यानंतर, भारतीयांने ज्या आश्वासनावर ब्रिटिशांना मदत केली. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी १९४२ मध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग भारतात पाठवण्यात आले. मात्र स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी जो अहवाल तयार केला त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे भारतातील नेत्यांकडून या अहवालाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.
त्यानंतर १९४६ मध्ये ‘त्रिमंत्री मंडळ’ भारताविषयी निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आले. या मंडळामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मंडळाच्या शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या स्वातंत्र्याची मागणी स्वीकारली होती. त्यामुळे भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने या मंडळाचा अहवाल स्वीकारला होता.
या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीमध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याची एक महत्वाची शिफारस होती. या शिफारशीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ मध्ये घेण्यात आली.

घटना परिषदेची रचना :

१) घटना परिषदेतील सदस्यांची संख्या- ३८९ यामध्ये २९६- सदस्य ब्रिटिश भारतातील होते, तर ९३- सदस्य हे भारतीय संस्थानातील होते.
2) निवडण्यात आलेले सदस्य हे १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडण्यात आलेले होते.
3) भारतातील सर्व समाजातील प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात आलेले होते.
4) निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे २०८ सदस्य होते. मुस्लीम लीगचे ७३ सदस्य होते. तर इतर छोट्या पक्षांना एकूण १५ जागा मिळाल्या होत्या.

घटना परिषदेचे कार्य:

I. ९ डिसेंबर १९४६ मध्ये या परिषदेच्या प्रत्यक्ष कार्याला सुरवात झाली.
II. घटना परिषदेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली.
III. ११ डिसेंबर १९४६ मध्ये राजेंद्र प्रसाद यांची घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
IV. मात्र मुस्लीम लीगकडून घटना परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला होता.
V. त्यामुळे २११ सदस्यांच्या घटना निर्मितीच्या कार्याला सुरवात झाली.

घटनेचा उद्देश ठराव:

कोणतेही कार्य करत असताना आपल्या समोर उद्दिष्ट असावे लागते. उदा. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्या समोर अधिकारी बनण्याचे उद्दिष्ट असते. त्याप्रमाणे भारत हा स्वातंत्र्यानंतर लोकशाही देश बनणार होता. त्यामुळे भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना घटना परिषदेसमोर काही उद्दिष्ट असणे आवश्यक होते. त्यामुळे १३ डिसेंबर १९४६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचा ठराव मांडला.
1) प्रशासनविषयक : ही घटना परिषद असे जाहीर करते कि, भारत देश स्वतंत्र, सार्वभौम, गणराज्य आहे व या देशाच्या प्रशासनासाठी आम्ही ही राज्यघटना निर्माण करू.
2) संघविषयक: सध्या भारतामध्ये समाविष्ट असणारा भुप्रदेश, राज्याचा भूप्रदेश, ब्रिटीश भारताबाहेरील भारताचा इतर भाग ज्यांना सार्वभौम भारताचा घटक बनण्याची इच्छा आहे, या सर्वांचा एक संघ असेल.
3) न्याय स्वातंत्र्य, समता यांची हमी व संरक्षण: न्याय- सामाजिक, राजकीय, आर्थिक यांच्या बाबतीत समता- दर्जा, संधी आणि कायद्यासमोर यांच्या बाबतीत स्वातंत्र्य- विचार, उच्चार, श्रद्धा, उपासना, व्यवसाय आणि संघटना या बाबतीत.
a) अल्पसंख्यांक व मागासांना संरक्षण: अल्पसंख्यांक, मागास आणि आदिवासी, वंचित व मागास वर्ग यांना पुरेसे संरक्षण
b) राज्यघटनेचा स्त्रोत- भारतीय लोक: सार्वभौम स्वतंत्र भारत, तिचे घटनात्मक भाग आणि शासनाची सत्ता आणि अधिसत्ता याचा स्त्रोत भारतीय लोक असतील.
c) सार्वभौम हक्क: गणराज्याची अखंडता व सभ्य राष्ट्राच्या न्याय व कायद्याप्रमाणे तिचा जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्र यावरचे सार्वभौम हक्क अबाधित राखला जाईल.
d) जगात मनाचे स्थान: ही प्राचीन भूमी, जगात तिचे न्याय हक्क आणि सन्मान प्राप्तल करेल. त्याचबरोबर मानवी समाजाचे कल्याण व जागतिक शांततेसाठी पूर्णपणे योगदान करेल.
e) स्वायतता : भारतीय भूभागाला राज्यघटनेप्रमाणे स्वायत्त एककाचा दर्जा दिला जाईल.

घटना परिषदेची इतर महत्वाची कामे

I. राष्ट्रीय ध्वज स्वीकारला – २२ जुलै १९४७
II. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी देण्यात आली.- मे १९४९
III. राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०
IV. राष्ट्रीय गीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०
V. पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली- २४ जानेवारी १९५०

घटना परिषदेविषयी विशेष महत्वाचे

या घटना परिषदेची स्थापना करण्यात आल्यापासून तिचे कामकाज २ वर्ष ११ महिने व १८ दिवस चालले. शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली. घटनापरिषदेने देशांच्या घटनांचा अभ्यास केला. या परिषदेवर एकूण कालावधीमध्ये ६० लाख रुपये खर्च झाले. या परिषदेचे एकूण ११४ दिवस अधिवेशन चालले.

घटना समितीतील महत्वाच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष

अ. क्र.   समितीचे नाव   समितीचे अध्यक्ष
१   संघराज्य घटना समिती   पं. जवाहरलाल नेहरू
२.   केंद्रीय उर्जा समिती   पं. जवाहरलाल नेहरू
३.   मसुदा समिती   डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४.   प्रांतीय राज्यघटना समिती   सरदार पटेल
५.   राज्य समिती   पं. जवाहरलाल नेहरू
६.   सुकाणू समिती   डॉ. राजेंद्र प्रसाद
७.   सभागृह समिती   पट्टाभी सीतारामय्या

मसुदा समिती

आपण पाहिलेल्या समितीमध्ये मसुदा समितीचे कार्य हे महत्वाचे होते. कारण, या समितीने घटनेला लिखित स्वरूप प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ मध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश करण्यात आलेला होता.
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( अध्यक्ष)
२) एन. गोपालस्वामी अय्यंगार
३) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर
४) के.एम.मुन्शी
५) सय्यद मोहमद शादुल्ला
६) एन. माधव राव
७) टी. टी. कृष्णम्माचारी ( यांची निवड खैतानच्या मृत्युनंतर करण्यात आली.)
मसुदा समितीने घटना परिषदेतील वेगवेगळ्या समित्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या गटांबरोबर चर्चा करून आपला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये प्रसिध्द केला.
तो मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांना त्यावर चर्चा करण्यासाठी व त्यावर आपले मत मांडण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. ज्या लोकांना आपले मत मांडावयाचे आहे त्यांच्यासाठी पत्राद्वारे आपले मत मांडण्यास परवानगी देण्यात आली.
- लोकांकडून आलेल्या मतानुसार काही दुरुस्त्या करण्यात आल्या. काही दुरुस्त्या करण्यात येऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये पुन्हा मसूदा तयार करण्यात आला.

मसुद्याचे कायद्यात रुपांतर कसे झाले ?

पहिले वाचन

४ नोव्हेंबर १९४८ मध्ये मसुदा घटना परिषदेसमोर ठेवण्यात आला. या परिषदेमध्ये मसुद्यावर सर्वसाधारण ५ दिवस चर्चा करण्यात आली. या वाचनामध्ये काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.

दुसरे वाचन

दुसऱ्या वाचन १५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९ या कालावधीदरम्यान करण्यात आले. पहिल्या वाचनामध्ये ज्या दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या होत्या त्यावर चर्चा करण्यात आली.

तिसरे वाचन

तिसरे वाचन १९ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आले. हे एक औपचारिक वाचन होते. कारण ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या दुसऱ्या वाचनादरम्यान करण्यात आलेल्या होत्या. या वाचनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा मान्यतेसाठी घटना समितीसमोर ठेवला.
२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना परिषदेकडून राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.

राज्य घटना प्रत्यक्ष लागू

- २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना प्रत्यक्ष लागू करण्यात आली. २६ जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आलेली होती.

राज्य घटनेची वैशिष्ट्ये :

a)विस्तृत लिखित राज्यघटना:

जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत. लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत.
मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ८ परिशिष्टे व ३९५ कलमे होती. सध्या १२ परिशिष्टे व ४५० कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

b) विविध स्त्रोतांपासून निर्मिती:

- राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.
- या राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा जास्त प्रमाणावर प्रभाव दिसून येतो.
- अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.
- आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.

c) मुलभूत हक्क:

- राज्यघटनेनुसार देशातील नागरिकांना काही मुलभूत हक्क देण्यात आलेले आहेत.
- राज्यघटनेमध्ये एकूण सहा प्रकारचे मुलभूत हक्क देण्यात आले आहेत.
- मुलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागामध्ये करण्यात आला आहे.

d) लवचिक व ताठर राज्यघटना :

- अमेरिकन राज्यघटना ही खूपच ताठर आहे. कारण या राज्यघटनेतील कलमांमध्ये सहजासहजी बदल / दुरुस्त्या करता येत नाहीत.
- तर ब्रिटिश राज्यघटना ही खूपच लवचिक आहे.
- मात्र घटनाकर्त्यांनी या दोन्हींचा विचार करून मधला मार्ग निवडला आहे.
- काही कलमांची दुरुस्ती ही सहज करता येते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष अशा बहुमताची गरज असते.

e) मुलभूत कर्तव्य :

- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती.
- या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
- मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत.
- ही केवळ आदर्शे आहेत.

f) निधर्मी राष्ट्र:

- पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे.
- मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे.
- सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
- अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

g) मार्गदर्शक तत्व:

- घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.
- शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
- ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत.
- या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.

h) एकेरी नागरिकत्व :

- अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते.
- भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे.

i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था :

- संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
- सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court)

j)मतदानाचा अधिकार :

- पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.
- मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

k)आणीबाणीची तरतूद :

- काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.
- या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात.

l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना:

- केंद्र, राज्य, पंचायत राज
- यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे.
- प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे.
- तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यघटनेविषयीचे काही दोष:

1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती.
2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.”
3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.”