नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२७ जानेवारी २०२२
स्मृती मानधना हिची ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड.....
🏏 भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे.
🏏 स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता.
🏏 पुरुष गटात यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आला नाही.
🏏 भारताच्या एकाही खेळाडूला ICCच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थानही मिळवता आले नाही.
🏏 स्मृतीने गेल्या वर्षी २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८५५ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीही तिने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होती.
🏏 पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची ICC प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. हा बहुमान त्याने प्रथमच पटकावला आहे. तसेच शाहीन आफ्रिदी वर्षातील सर्वात तरुण खेळाडू आहे. (वयाच्या २१व्या वर्षी)
🏏 इंग्लंडचा कसोटी कप्तान जो रूट : ICCचा कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर (पुरुष)
🏏 बाबर आझम : एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू (पुरुष)
महाराष्ट्र चित्ररथ
१. महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा (Kass Plateau) समावेश असून येथे आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांसोबतच ‘सुपरबा’ (Suparba) या दुर्मिळ सरड्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे.
२. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’च्या (Shekru) सुमारे 15 फुटांची आकर्षक प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण’चे (Tamhan) सुमारे दीड फूटाचे गुच्छही ठेवण्यात आले आहेत. त्यावर छोटी छोटी फुलपाखरेही दाखवण्यात आली आहेत.
३. चित्ररथावरील महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’च्या (Hariyal) प्रतिकृतीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या. शेवटच्या टप्प्यातील सुमारे 15 फुटाचं आंब्याचे झाड (mango tree) विशेष आकर्षक दिसत होते.
४. याशिवाय चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू (butterfly) ‘ब्ल्यू मॉरमॉन’ची (Blue Mormon) आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली.
चालू घडामोडी
1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.
1. कांस्य
2. रौप्य
3. सुवर्ण
4. यापैकी नाही
उत्तर- 2
----------------------------------------------------
2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.
1. सुहास यथीराज
2. कृष्णा नागर
3. प्रमोद भगत
4. मनीष नरवाल
उत्तर- 2
----------------------------------------------------
3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.
1. भारत आणि चीन
2. भारत आणि सिंगापूर
3. भारत आणि अमेरिका
4. भारत आणि ऑस्ट्रेलिया
उत्तर- 2
---------------------------------------------------
4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.
1. मध्य प्रदेश
2. महाराष्ट्र
3. केरळ
4. दिल्ली
उत्तर- 3
---------------------------------------------------
5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.
1. सिक्कीम
2. आसाम
3. हिमाचल प्रदेश
4. यापैकी नाही
उत्तर-2
----------------------------------------------------
6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.
1. कृष्णा नागर
2. सुहास यथिराज
3. मनीष नरवाल
4. अवनी लेखारा
उत्तर- 4
----------------------------------------------------
7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
1. मेघालय
2. अरुणाचल प्रदेश
3. सिक्कीम
4.आसाम
उत्तर – 4
----------------------------------------------------
8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?
1. 3 सप्टेंबर
2. 4 सप्टेंबर
3. 5 सप्टेंबर
4. 6 सप्टेंबर
उत्तर- 3
----------------------------------------------------
9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.
1. बँक ऑफ इंडिया
2. बँक ऑफ महाराष्ट्र
3. Axis बँक
4. आयसीआयसीआय बँक
उत्तर- 1
----------------------------------------------------
10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.
1. चीन
2. नेपाळ
3. भारत
4. श्रीलंका
उत्तर- 3
1. कोणते राज्य हे देशातील पहिले धूम्रमुक्त राज्य बनले आहे?
1) आंध्रप्रदेश
2) झारखंड
3) हिमाचल प्रदेश
4) नागालँड
उत्तर-3
------------------------------------------------------------
2. ICC महिला विश्वचषक 2022 स्पर्धेसाठी BCCI ने भारतीय महिला संघाचे व्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
1) भरत अरुण
2) शैलेंद्रसिंह सोलंकी
3) राहुल द्रविड
4) विराट कोहली
उत्तर- 2
------------------------------------------------------------
3. नुकतेच उंटांसाठी जगातील पहिले हॉटेल कोठे सुरू करण्यात आले आहे?
1) पाकिस्तान
2) सौदी अरेबिया
3) कझाखस्तान
4) इराण
उत्तर-2
------------------------------------------------------------
4. खालीलपैकी कोणते न्यायालय हे 'न्याय घड्याळ' असणारे भारतातील पहिले न्यायालय ठरले आहे?
1) गुजरात उच्च न्यायालयात
2) दिल्ली उच्च न्यायालय
3)मुंबई उच्च न्यायालय
4) केरळ उच्च न्यायालय
उत्तर-1
------------------------------------------------------------
5. अलिकडेच कोणत्या देशाने गुरुत्वाकर्षणाच्या प्रयोगासाठी "कृत्रिम चंद्र" तयार केला आहे?
1) चीन
2) रशिया
3) अमेरिका
4) भारत
उत्तर-1
------------------------------------------------------------
6 नुकतेच निधन झालेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या शांती देवी ह्या कोणत्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या?
1) त्रिपुरा
2) मेघालय
3) गुजरात
4) ओडिशा
उत्तर- 4
------------------------------------------------------------
7. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) च्या कोणत्या युनिटमध्ये भारतातील पहिला 'कोल टू मिथेनॉल' (CTM) पायलट प्लांट समर्पित केला आहे?
1) भोपाळ
2) मुंबई
3) हैदराबाद
4) बंगळुरू
उत्तर- 3
------------------------------------------------------------
8. नुकतेच निधन झालेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) डॉ.पाटील हे पुणे विद्यापीठातील पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य होते
ब) त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन तीन विद्यापीठांनी डी. लीट ही सन्माननीय उपाधी देऊन सन्मानित केले होते.
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब
4) एकही नाही
उत्तर- 2
Correct ans- अ) डॉ.पाटील हे शिवाजी विद्यापीठातील पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य होते
------------------------------------------------------------
9. 2022 महिला हॉकी एशिया कप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणारआहे?
1) इंडोनेशिया
2)ओमान
3) थायलंड
4) जर्मनी
उत्तर-2
------------------------------------------------------------
10. खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने खुल्या डेटाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताच्या शहरी परिसंस्थेमध्ये नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ओपन डेटा सप्ताह सुरू करण्याची घोषणा केली आहे?
1) गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
2) केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय
3) गृह मंत्रालय
4) सांस्कृतिक मंत्रालय
उत्तर- 1
================================
महत्वाचे धरण नदी आणि जिल्हे
🔰 भंडारदरा - प्रवरा 👉 अहमदनगर
🔰 जायकवाडी - गोदावरी 👉 औरंगाबाद
🔰 सिद्धेश्वर - दक्षिणपूर्णा 👉 हिंगोली
🔰 भाटघर - वेळवंडी(निरा) 👉 पुणे
🔰 मोडकसागर - वैतरणा 👉 ठाणे
🔰 येलदरी - दक्षिणपूर्णा 👉 हिंगोली
🔰 मुळशी - मुळा 👉 पुणे
🔰 तोतलाडोह - पेंच 👉 नागपुर
🔰 विरधरण - नीरा 👉 पुणे
🔰 गंगापूर - गोदावरी 👉 नाशिक
🔰 दारणा - दारणा 👉 नाशिक
🔰 पानशेत - अंबी(मुळा) 👉 पुणे
🔰 माजलगाव - सिंदफणा 👉 बीड
🔰 बिंदुसरा - बिंदुसरा 👉 बीड
🔰 खडकवासला - मुठा 👉 पुणे
🔰 कोयना(हेळवाक) - कोयना 👉 सातारा
🔰 राधानगरी - भोगावती 👉 कोल्हापूर
महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य
🔆 अंधारी ----------- चंद्रपुर
🔆 बोर --------------- वर्धा
🔆 टिपेश्वर ----------- यवतमाळ
🔆 नागझिरा --------- भंडारा
🔆 भामरागड -------- गडचिरोली
🔆 चपराळा --------- गडचिरोली
🔆 मेळघाट ----------- अमरावती
🔆 नर्नाळा ------------- अकोला
🔆 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक
🔆 यावल -------------- जळगाव
🔆 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद
🔆 अनेर डॅम ------------ धुळे
🔆 लोणार अभयारण्य - बुलढाणा
🔆 तानसा --------------- ठाणे
🔆 फनसाड -------------- रायगड
🔆 भीमाशंकर ---------- पुणे
🔆 रेहकुरी --------------- अहमदनगर
🔆 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे
🔆 राधानगरी ------------ कोल्हापूर
🔆 सागरेश्वर -------------- सांगली
🔆 कोयना ---------------- सातारा
🔆 मालवण -------------- सिंधुदुर्ग
🔆 तुंगारेश्वर -------------- ठाणे
Latest post
ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.
१. डॉ. अम्ब्रीश मिथल -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...