Saturday, 8 January 2022

महत्त्वाचे आहे नक्की वाचा : भारतीय निवडणूक आयोग


- संवैधानिक संस्था
- कलम 324
- स्थापना: 25 जानेवारी 1950
- निवडणुका: राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ
- पहिले मुख्य निवडणूक आयुक्त: सुकुमार सेन
- मुख्य आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात: 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे ते पदावर राहतात
----------------------------------------

राज्यसभा
- संसदेचे उच्च सभागृह
- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात
- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त
- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)
- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा
- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा
----------------------------------------
● लोकसभा
- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)
- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952
- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014
-------------------------------------------

लोकसभा निवडणूक 2014
- 16 वी लोकसभा निवडणूक
- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान
- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना
- एकूण मतदारसंघ: 543
- एकूण मतदान केंद्र: 927553
- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)
राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3
- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)
---------------------------------------

पक्षीय बलाबल
- भारतीय जनता पक्ष: 282
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06
- कम्युनिस्ट पक्ष: 01
- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09
- राज्यस्तीय पक्ष: 182
- नोंदणीकृत पक्ष: 16
- अपक्ष: 03
----------------------------------------

वैशिष्ट्ये
- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला.
- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला
- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला.
- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये
--------------------------------------
• महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014
- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे.
- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले.
- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.
- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला

महाराष्ट्रातील पंचायत राज- महत्त्वपूर्ण माहिती.


🅾आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
🅾 स्थानिक स्वराज्य संस्था

2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
🅾 2 ऑक्टोबर 1953

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
🅾16 जानेवारी 1957

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
🅾 वसंतराव नाईक समिती

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
🅾27 जून 1960

6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
🅾महसूल मंत्री

🔘
7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
🅾226

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
🅾 जिल्हा परिषद

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
🅾तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
🅾 1 मे 1962

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
🅾महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
🅾 7 ते 17

13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
🅾जिल्हाधिकारी

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
🅾 जिल्हाधिकारी

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
🅾 5 वर्षे

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
🅾 पहिल्या सभेपासून

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
🅾 तहसीलदार

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
🅾 विभागीय आयुक्त

🅾19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾सरपंच

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾पंचायत समिती सभापती

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
🅾दोन तृतीयांश (2/3)

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
🅾 तीन चतुर्थांश (3/4)

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾पंचायत समिती सभापती

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾 जिल्हा परिषद अध्यक्ष

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾 संबंधित विषय समिती सभापती

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾 जिल्हा परिषद अध्यक्ष

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾विभागीय आयुक्त

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
🅾 ग्रामसेवक

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
🅾जिल्हा परिषदेचा

30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
🅾जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
🅾ग्रामसेवक

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
🅾शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
🅾 राज्यशासनाला

34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
🅾 विस्तार अधिकारी

35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
🅾 ग्रामविकास खाते

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
🅾जिल्ह्याचे पालकमंत्री

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
🅾जिल्हाधिकारी

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
🅾दहा (स्थायी+9 विषय समित्या)

39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
🅾 स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
🅾 जिल्हा परिषद अध्यक्ष

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
🅾वसंतराव नाईक

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

केशवानंद भारती खटला

🔘 राज्यशास्त्र Imp घटक

🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.

🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.

🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.

🔸संसदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?

🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.

🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.*

🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.

🔸या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले.

🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की
' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.

🔸संसदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.

🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.

🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.

🔸केशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*

कार्बन चक्र


कार्बनाचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व त्याची पुनरुपयुक्तता म्हणजे कार्बन चक्र होय.

✍कार्बनाच्या अणूंचे मुख्यतः प्रकाशसंश्लेषण व श्वसनक्रियेद्वारे अभिसरण व त्याची पुनरुपयुक्तता होते. वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड (Co2) वायू केवळ ०.०३% असतो. उष्ण कटिबंधात कार्बन चक्र प्रभावी असते.

✍पृथ्वीवर कार्बन चक्र अविरत चालू असते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून होणारी अन्ननिर्मिती फक्त सूर्यप्रकाशात होते. जैविक व अजैविक प्रक्रिया, प्रकाशसंश्लेषण, श्वसन, अपघटन इ. वेगवेगळ्या प्रक्रियांद्वारे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड वायू वनस्पती व प्राणी यांच्या माध्यमातून संक्रमित होऊन पुन्हा हवेत मिसळत असतो.

✍हिरव्या वनस्पती आपल्या पानांद्वारे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून घेतात. त्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डाय-ऑक्साइडाचे कार्बोदके, प्रथिने व मेद यांमध्ये रूपांतर करतात. तृणभक्षक प्राणी आपल्या आहारात हिरव्या वनस्पतींचा उपयोग करतात.

✍तृणभक्षक प्राण्यांना मांसभक्षक प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतींकडून कार्बोदके, प्रथिने व मेद हे कार्बनी पदार्थ तृणभक्षक प्राण्यांकडे, तृणभक्षक प्राण्यांकडून मांसभक्षक प्राण्यांकडे आणि मांसभक्षक प्राण्यांकडून सर्वभक्षी प्राण्यांकडे संक्रमित होतात.

✍शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यांसारख्या अपघटकांकडून अपघटन होऊन कार्बन डाय-ऑक्साइड वायू मुक्त होतो. हा वायू वातावरणात मिसळतो व साठला जातो.

✍अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसर्‍या सजीवाकडे कार्बनाचे अभिसरण चालू असते. सागरी वनस्पतीसुद्धा समुद्राच्या पाण्यात विरघळलेला कार्बन डाय-ऑक्साइड वायू प्रकाशसंश्लेषणासाठी वापरतात. सागरी वनस्पतीकडून तो सागरी प्राण्यांकडे संक्रमित होतो.

✍सागरी वनस्पती व प्राणी मृत झाल्यावर त्यांच्या अपघटनातून कार्बन डाय-ऑक्साइड पुन्हा वातावरणात मिसळतो. वनस्पती व प्राणी या दोहोंच्याही श्वसनक्रियेत कार्बोदकाचे ऑक्सिडीभवन घडून येते आणि तयार झालेला कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात मिसळतो. वातावरणात पुन्हा कार्बन मिसळण्याच्या या जैविक प्रक्रिया आहेत.

✍वनस्पती, प्राणी व खनिज तेले यांचा कार्बन हा महत्त्वाचा घटक आहे. दगडी कोळसा, हिरा, ग्रॅफाइट या स्वरूपात कार्बन भूकवचात विखुरलेला असतो.

✍धातूंच्या खनिजांत तो कार्बोनेट या रूपात आढळतो. वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड हा कार्बनाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे कार्बन चक्रात कार्बन डाय-ऑक्साइड अत्यंत महत्त्वाचा आहे.

✍जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखी उद्रेक प्रसंगी कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर पडून हवेत मिसळतो. वातावरणात पुन्हा कार्बन मिसळण्याच्या या अजैविक प्रक्रिया आहेत.

✍प्रकाशसंश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनाने कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड वायू यांचा निसर्गतः समतोल राखला जातो.

1833 चा तिसरा सनदी कायदा

👉 कंपनीची मुदत 20 वर्षाने वाढविली.

👉 कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आणली (चाची संपुष्टात i.e. चहा आणि चीन) म्हणजेच इतर ब्रिटिशांना भारतात व्यापार करण्याची परवानगी मिळाली.

👉 आता कंपनी फक्त प्रशासकीय कार्य करणार.

👉 बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. (पहिला - लॉर्ड विलयम बेंटिंग)

👉 मुंबई व मद्रास च्या गव्हर्नर चे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले.

👉 कोणत्याही भारतीयाला कंपनीत कोणतेही पद धारण करण्यास बंदी असणार नाही. (संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द केली)

👉 गुलामांची पद्धत नष्ट करण्याचा भारत सरकारला आदेश.

  〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

इंग्रज अधिकारी व कामगिरी


▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट*

◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक

भास्करराव विठोजीराव जाधव

◾️भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे

◾️ रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते

◾️मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते

◾️महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले. 

◾️पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. 

◾️दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले. 

◾️१८९५ ते १९२१ या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, १९०१ च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली

◾️बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते

◾️शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल १४ वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली

◾️करवीरची जनता त्यांचा 'कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार' असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.

◾️त्यांना प्रति शाहू महाराज असेही म्हटले जाते

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन

📚अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते.

📚 कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत.

📚सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.

📚त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरु केले होते.

📚‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरु केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.

📚त्यांची भाषा प्रभावी आणि परखड होती. कुर्बान हुसेन हे एका सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्माला आले. ते गिरणी कामगार होते. कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते, ते सभांमध्ये अतिशय प्रभावी भाषणे करीत असत. ५ मे १९३० रोजी महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर सोलापूर शहरात जे सभा झाली, त्यातील त्यांचे भाषण ऐकून तरुण कार्यकर्ते इंग्रजाविरुद्ध पेटून उठले होते.

📚 सोलापुरातील तरुण रस्त्यावर उतरल्यानंतर येथील परिस्थिती कलेक्टर यांच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे ९, १०, ११ मे १९३० हे तीन दिवस सोलापूर शहरात इंग्रज सरकारचे शासनच नव्हते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी तीन दिवस सोलापूर शहराने पूर्ण स्वातंत्र्य अनुभवले.

MPSC ला विचारले जाणारी व मागच्या परीक्षेत विचारलेली डोंगर रंगावरची काही प्रश्न:

ग्रेटर हिमालयातील डोंगर रांगाचा उत्तर ते दक्षिण क्रम लावा.
०काराकोरम पर्वत
०लडाख
०झास्कर
०पीर पांजल
०शिवालीक पर्वत

दक्षिण भारतातील पर्वत डोंगररांगा ची दक्षिण ते उत्तर असा क्रम लावा.:
०निलगिरी पर्वत
०शेवरॉय
०जावडी
०पलकोंडा
०नल्लामल्ला पर्वत

मध्य भारतातील डोंगररांगा चा उत्तर ते दक्षिण असा उतरता क्रम:
०अरवली पर्वत
०विंध्य पर्वत
०सातपुडा
०सातमाळा
०अजिंठा
०बालाघाट
०महादेव डोंगर

पूर्वोत्तर भारतातील टेकड्या उत्तर ते दक्षिण या क्रमाने लावा
मिष्मी टेकड्या
डफला
नागा
बारील
मिकीर
गारो/खाशी

जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात

 ◾️ हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु

◾️ गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी

◾️रोम शहर - सात टेकड्यांचे शहर

◾️ ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी

◾️ व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी

◾️ पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे

◾️ सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '

◾️ बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार

◾️ डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर

◾️ अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे

◾️ बेलग्रेड शहर - श्वेत शहर

◾️ शिकागो शहर - उद्यानाचे शहर

◾️ जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली

◾️ ल्हासा शहर - निषिद्ध शहर

◾️ न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर

◾️ स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस

महत्त्वाच्या दऱ्या.


🧩काश्मीर दरी :

🅾पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.

🧩कांग्रा दरी :

🅾हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

🧩कुलू दरी :

🅾रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.

🧩काठमांडू दरी :

🅾नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.

🧩शिवालिक रांगा/ बाह्य हिमालय (Outer Himalaya) :

🅾हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात.

🅾हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच ‘डून’ असे म्हणतात .

🅾उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर), शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

केंद्रीय पीक संशोधन केंद्र.

१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
       =लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
       =कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
       =फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
       =कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
      =कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
      =सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
      =मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
      =कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
      =सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
      =नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
      =अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
      =झाशी (मध्‍यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
      =पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
      =पहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
      =राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
      =नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
      =इंदोर (मध्‍यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
      =नागपूर
२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
      =राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
      =सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
      =जोरबीट (राजस्‍थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
      =रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
      =गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
     =केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
     =हैदराबाद (आंध्रप्रदेश)

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...