Thursday, 6 January 2022

भारतीय राज्यघटने संबंधित महत्त्वाच्या दिनांक


9 डिसेंबर 1946    ➖  संविधान सभेचे पहिले बैठक.
11 डिसेंबर 1946  ➖ डॉ  राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड.
13 डिसेंबर 1946  ➖ प. नेहमी  उद्दिष्टांचा ठराव मांडला.
22 जानेवारी 1947➖ उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर .
18 जुलै 1947      ➖ भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर.
22 जुलै 1947      ➖ भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत.
14 ऑगस्ट 1947  ➖ घटना समितीला सार्वभौमत्व प्राप्त.
29 ऑगस्ट 1947  ➖ मसुदा समितीची स्थापना.
26 नोव्हेंबर 1949  ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत.
26 जानेवारी 1950 ➖ भारतीय राज्यघटनेचे अंमलबजावणी.
24 जानेवारी 1950 ➖ राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत स्वीकृत.
24 जानेवारी 1950 ➖ संविधान सभेची शेवटची व विशेष बैठक.
18 डिसेंबर 1976   ➖ 42 वी घटनादुरुस्ती करण्यात आली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔷

खाली दिलेल्या नेत्यांचे गुरू कोण ते सांगा

1】लोकमान्य टिळक यांचे गुरू कोण होते❓के●टी●तेलंग✅

2】महात्मा गांधी यांचे गुरू कोण होते ❓
      गोपालकृष्ण गोखले✅

3】स्वतंत्र्यवीर सावरकर यांचे गुरू कोण होते❓श्यामजी कृष्ण वर्मा✅

4】रवींद्रनाथ टागोर यांचे गुरू कोण होते❓बँकिंचंद्र चॅटर्जी✅

5】न्यामुर्ती रानडे यांचे गुरू कोण होते❓
     के●टी●तेलंग✅

6】अरविंद घोष यांचे गुरू कोण होते❓
     विष्णू भास्कर लेले✅

7】गोपालकृष्ण गोखले यांचे गुरू कोण होते❓न्यामुर्ती रानडे✅

8】सुभाषचंद्र बोस यांचे गुरू कोण होते❓चित्तरंजन दास✅

9】डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू कोण होते❓महात्मा फुले,शाहू महाराज,संत कबीर✅

सजीव व गुणसूत्रांची संख्या

🦁 प्राणी -

❇️ मानव:- 46

❇️ डास:- 06

❇️ चिम्पाझी:- 48

❇️ सिंह:- 76

❇️ माशी:- 12

❇️ माकड:- 42

❇️ घोडा:- 64

❇️ कुत्रा:- 78

❇️ मेंढी :- 54

❇️ शेळी :- 60

❇️ उंदीर :- 42

❇️ कोंबडी :- 78

❇️ उंट :- 64

❇️ हत्ती :- 58

❇️ डुक्कर :- 38

❇️ ससा :- 44

❇️ हरीण :- 68

❇️ कबुतर :- 80

🌳 वनस्पती -

✳️ तांदूळ - 24

✳️ गहू - 42

✳️ मका - 20

✳️ बटाटा - 48

✳️ सोयाबीन - 40

✳️ टोमॅटो - 24

✳️ कलिंगड - 22

✳️ ऊस - 80

✳️ कापूस - 56

✳️ कांदा - 32

✳️ कोबी -18

━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा

कोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?

(A) फ्रान्स
(B) इस्त्रायल✅✅
(C) टर्की
(D) रशिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभे करण्यासाठी भारताकडून मदत केली जात आहे?

(A) रवांडा
(B) सुदान
(C) अल्जेरिया
(D) युगांडा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्याने ‘श्रम सिद्धी’ योजना राज्यात लागू केली?

(A) उत्तरप्रदेश
(B) हरयाणा
(C) राजस्थान
(D) मध्यप्रदेश✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला न्यूयॉर्क इंटेलेक्चुवल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन या संस्थेच्या वतीने ‘इंव्हेंटर ऑफ द इयर’ हा सन्मान जाहीर केला गेला?

(A) कविता सेठ
(B) छेको असाकावा
(C) राजीव जोशी✅✅
(D) सत्य चौहान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‘जागतिक थायरॉईड दिवस’ कधी पाळला जातो?

(A) 25 मे✅✅
(B) 26 मे
(C) 27 मे
(D) 28 मे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत  कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
१)४२ वी घनादुरुस्ती️️
२)४४) वी घनादुरुस्ती
३)६१ वी घनादुरुस्ती
४)२४ वी घटनादुरुस्ती

प्रश्न.२. भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले ?
१)८ डिसेंबर १९४६
२)९ डिसेंबर १९४६️️
३)१५ डिसेंबर १९४६
४) १५ ऑगस्ट १९४७

प्रश्न.३.कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
a) कृषक प्रजा पक्ष b) शेड्युल कास्ट फेडरेशन c)कम्युनिस्ट पक्ष d) अपक्ष
१)a.c.d
२)b.c.d
३)a.b.d
४)a.b.c️️

प्रश्न.४. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?
१) मराठी
२)सिंधी
३)मारवाडी️️
४) संथाली

प्र.५. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?
१)राज्यघटनेची उद्द्देशिका
२)राज्याची मार्गदर्शक तत्वे✔️✔️
३)मूलभूत कर्तव्य
४) नववी सूची

प्रश्न.६.योग्य कथन/कथने ओळखा.
१)४२ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
२)८६ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये ११ कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.
A)कथन (A) फक्त
B)कथन (ब) फक्त
C)दोन्ही कथने (A) (B) बरोबर आहेत️️
D)दोन्ही कथने (A) (B) चूक आहेत

प्रश्न.७.रजनेतीच्या मार्गदर्शक तत्त्वंच्या संधर्भात कोणते गुंणशिष्टे गैरलागू ठरते ?
१)मूलभूत आधीकारांशी  अनुरूप
२) न्यायालयीन निर्णय योग्य ️️
३) परिवर्तन
४) कल्याणप्रद

प्रश्न.९.कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे ?
१)राधाकृष्ण आयोग️️
२)मुदलियार आयोग
३)कोठारी आयोग
४) जॉन सार्जंट आयोग

प्रश्न.१०.१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना झाली ?
१)मुंबई
२)पुणे️️
३) अमरावती
४)कोल्हापूर

प्रश्न.११.सेंट्रल हिंदु कॉलेज ची स्थापना कोणी केली ?
१)स्वामी दयानंद
२)स्वामी विवेकानंद
३) अँनी बेझंट️️
४) केशव चंद्र सेन

प्रश्न.१२.मराठी भाषा पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो ?
१)१९ ते २४ नोव्हेंबर
२)१५ ते २९ डिसेंबर
३)१ ते १५ जानेवारी️️
४)१ ते १५ फेब्रुवार

प्रश्न.१३.'खटूआ समिती' खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?
१)GST संकलन
२) ओला उबेर भाडे निश्चिती
३)रेल्वे आधुनिकीकरण️️
४)सरपंच - गोपिनियातेची शपत

प्रश्न.१४.महाराष्ट्रातील सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चा हेतू कोणता ?
१) मुख्यमंत्र्यांना सुरक्षा प्रदान करणे सुरक्षित ठेवणे
२) सामाजिक सुरक्षा
३) शासकिय संकेत स्थळावरील माहिती सुरक्षित ठेवणे
४)सांस्कृतिक वारसा स्थळांची सुरक्षा️

आजची प्रश्नमंजुषा

________________________________

🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान .....येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.? 
 
      A) दिल्ली

      B) पाटणा ✅✅

      C) मुंबई

      D) मद्रास
________________________________
🟡....... रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?

     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅✅

     D) 25 डिसेंबर 1952
________________________________
🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?

     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

    D) एच. सी .मुखर्जी
________________________________

🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?

     A) जपान

     B) जर्मनी ✅✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका
________________________________

⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम......... मध्ये देण्यात आली.*

       A)368 ✅✅

      B)365

      C)360

      D)352
________________________________
⚪️ मतदानाचे किमान वय........ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?

      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या
________________________________

🟤 बलवंतराय मेहता समिती......  मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?

     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966
________________________________
🔴 ......... मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?

     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅✅

     C) 13 डिसेंबर 2016

     D)10 मार्च 2011
________________________________

🟠स्वातंत्र्याचा हक्क कलम .......ते.......मध्ये देण्यात आला.?

    A)14 ते 18

     B)19 ते 22✅✅

     C)25 ते 28

     D)23 व 24
________________________________

🔴 अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलमे आहेत?

     A)21
     B)15
     C)7 ✅✅
     D)14
________________________________

1)"जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)
A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री
=========================
2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942
उत्तर : 1942
=========================
3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
A. लाला लजपत राय
C. श्री ओरबिंदो
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
=========================
4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी
उत्तर : बाळ गंगाधर टिळक
=========================
5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा
उत्तर : कुचीपुडी
=========================

आजची प्रश्नमंजुषा

 पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.
ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.
क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.
ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

पर्याय..
1] दौलताबाद
2] खुलताबाद✅✅
3] वेरूळ
4] अजिंठा

. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली
A) सोन्स
B) अँड सब्ज़सन्स.
C) जॉन लोहनस्ल.
D) सोरेन्सन.✅✅
E) यापैकी नाही.

. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?
A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा 
C) जल विद्युत ऊर्जा
D) यापैकी नाही

. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही
A. नांदेड✅✅
B. कल्याण-डोंबिवली
C. ठाणे
D. नाशिक

. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 
A) 1961
B) 1974
C) 1985 ✅✅
D) 2010

 भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?
1)उत्कर्ष सिन्हा
2)प्रिती पटेल
3)चंद्रमा शहा ✅✅
4)गीता सिंग

 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?
(A) सविता छाबरा ✅✅
(B) तवलीन सिंग
(C) भालचंद्र मुणगेकर
(D) सलमान रश्दी

 कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?
(A) लियू झियाबो
(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅
(C) मार्टिन एन्नाल्स
(D) नटालिया एस्टेमिरोव्हा

पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्न

1.  श्रीरामपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - मोसंबी. 

2.  भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे?
✅.  - प्रवरानगर. 

3.  प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅. - गोदावरी. 

4.   रेहकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अहमदनगर. 

5.   हरिषचंद्र डोंगररांग कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवरून जाते?
✅. - नगर व पुणे. 

6.  नंदूरबार जिल्ह्यातून नर्मदा नदी किती कि.मी. वाहते?
✅.  - 58 कि.मी. 

7.  नंदुरबार जिल्ह्यातून जाणार्‍या पर्वत रांगेस काय म्हणतात?
✅. - तोरणमाळ पठार. 

8.   तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - नंदुरबार. 

9.   जळगावला पूर्वी काय म्हणत असत?
✅. - पूर्व खानदेश.

10.   राज्यात सर्वाधिक आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - नंदुरबार.

11.  नाशिक जिल्ह्यातील कोणते गाव सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - मालेगाव.

12.  पितांबरासाठी प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील गाव कोणते?
✅.  - येवले. 

13.   नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?.
✅.  - नाशिक.

14.   भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अहमदनगर. 

15.   राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅.  - अहमदनगर. 

16.   आर्मड कोअर सेंटर कोठे आहे?
✅.  - अहमदनगर. 

17.  महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
✅. - अहमदनगर. 

18. पोकरी औष्णिक वीज केंद्र कोठे आहे?
✅  - भुसावळ. 

19.  मुंबई-हावडा ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो?
✅.  - जळगाव. 

20.   आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो?
✅.  - पहिला. 

21.   कोणता जिल्हा रस्त्याच्या मार्गाने गुजरात व मध्यप्रदेश राज्यांशी जोडला आहे?
✅.  - नंदुरबार.

22.   6 व्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
✅.  - धुळे-नागपूर. 

23.    मुंबई-आग्रा हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो?
✅. - धुळे. 

24.   सूरत-धुळे-नागपूर हा माहामार्ग कोणत्या क्रमांकाचा आहे?
✅. - 6. 

25.  राजवाडे वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
✅. - धुळे. 

26.  अस्थंबा शिखर कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅.  - अश्वथामाचे निवास. 

 27.  पोलिस उपनिरीक्षिक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
✅. - नाशिक. 

28.  राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 कोठून कोठे जातो?
✅.  - पुणे-नाशिक. 

29.   महाराष्ट्रात सुरू होणारा व महाराष्ट्रात संपणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
✅.  - पुणे-नाशिक (क्र.50) न्हावासेवा-पळसपे (क्र.4ब), धुळे-सोलापूर (क्र.211).

 30. भोगावती नदीवर कोठे धरण बांधले आहे?
✅. - राधानगरी.

दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity) :

◆ तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.

◆ वातावरणात असणार्‍या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.

◆ जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात.

◆ ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास 'दवबिंदू तापमान' म्हणतात. हवेमध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते.

◆ हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच 'आर्द्रता' म्हणतात.

◆ ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.

◆ एकक आकारामानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास 'निरपेक्ष आर्द्रता' असे म्हणतात.

◆ सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.

◆ हवा संतृप्त होण्यासाठी लागणार्‍या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून आहे.

◆ हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावले असेल तर ती हवा 'असंतृप्त' आहे असे म्हटतात.

◆ जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्यात बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते.

◆ याउलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्याव बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते.

◆ हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ हवेमध्ये ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुमान व तेच आकारमान त्याच तापमानास संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणार्याआ पाण्याचे वस्तुमान याच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात.

◆ सापेक्ष आर्द्रता शेकडेवारीत सांगतात.

◆ दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते.

◆ जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.

◆ थंड जमीन तिच्या सान्निध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संघनन (condensation) होते तेव्हा धुके (Fog) तयार होते.

◆ जेव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हा सुद्धा धुके तयार होते. सागरी धुके (Sea Fog) यामुळे तयार होते.

◆ उंचावरून जाणार्‍या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा(त्राईल) दिसते. विमान उडत असताना इंजीनापासून निघणार्‍या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होतात.

◆ जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर तेजोरेखा लांबच लांब दिसते.

◆ जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान तेजोरेखा तयार होते किंवा तयार सुद्धा होत नाही.

रसायन सूत्र

1. आक्सीजन—O₂

2. नाइट्रोजन—N₂

3. हाइड्रोजन—H₂

4. कार्बन डाइऑक्साइड—CO₂

5. कार्बन मोनोआक्साइड—CO

6. सल्फर डाइऑक्साइड—SO₂

7. नाइट्रोजन डाइऑक्साइड—NO₂

8. नाइट्रोजन मोनोऑक्साइड (नाइट्रिक ऑक्साइड) — NO

9. डाईनाइट्रोजन ऑक्साइड (नाइट्रस ऑक्साइड) — N₂O

10. क्लोरीन — Cl₂

11. हाइड्रोजन क्लोराइड—HCl

12. अमोनिया — NH₃

अम्ल
13. हाइड्रोक्लोरिक एसिड — HCl

14. सल्फ्यूरिक एसिड — H₂SO₄

15. नाइट्रिक एसिड — HNO₃

16. फॉस्फोरिक एसिड — H₃PO₄

17. कार्बोनिक एसिड — H₂CO₃

क्षार
18. सोडियम हाइड्राक्साइड—NaOH

19. पोटेशियम हाइड्राक्साइड—KOH

20. कैल्शियम हाइड्राक्साइड—Ca(OH)₂

लवण
21. सोडियम क्लोराइड—NaCl

22. कार्बोनेट सोडियम—Na₂CO₃

23. कैल्शियम कार्बोनेट — CaCO₃

24. कैल्शियम सल्फेट — CaSO₄

25. अमोनियम सल्फेट — (NH₄)₂SO₄

26. नाइट्रेट पोटेशियम—KNO₃

आम रसायनों के व्यावसायिक एवं रासायनिक नाम
व्यावसायिक नाम — IAPUC नाम — अणु सूत्र
27. चाक — कैल्सियम कार्बोनेट — CaCO₃

28. अंगूर का सत — ग्लूकोज — C6H₁₂O6

एल्कोहल — एथिल 29. एल्कोहल — C₂H5OH
30. कास्टिक पोटाश —  पोटेशियम हाईड्राक्साईड — KOH

31. खाने का सोडा — सोडियम बाईकार्बोनेट — NaHCO₃

32. चूना — कैल्सियम आक्साईड — CaO

33. जिप्सम — कैल्सियम सल्फेट — CaSO₄.2H₂O

34. टी.एन.टी. — ट्राई नाईट्रो टालीन — C6H₂CH₃(NO₂)₃

35. धोने का सोडा — सोडियम कार्बोनेट — Na₂CO₃

36. नीला थोथा — कॉपर सल्फेट — CuSO₄

37. नौसादर — अमोनियम क्लोराईड — NH₄Cl

38. फिटकरी — पोटैसियम एलुमिनियम सल्फेट — K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O

39. बुझा चूना — कैल्सियम हाईड्राक्साईड — Ca(OH)₂

40. मंड — स्टार्च — C6H10O5

41. लाफिंग गैस — नाइट्रस आक्साईड — N₂O

42. लाल दवा — पोटैसियम परमैगनेट — KMnO₄

43. लाल सिंदूर — लैड परआक्साईड — Pb₃O₄

44. शुष्क बर्फ — ठोस कार्बन-डाई-आक्साईड — CO₂

45. शोरा — पोटैसियम नाइट्रेट — KNO₃

46. सिरका — एसिटिक एसिड का तनु घोल — CH₃COOH

47. सुहागा — बोरेक्स — Na₂B₄O7.10H₂O

48. स्प्रिट — मैथिल एल्कोहल — CH₃OH

49. स्लेट — सिलिका एलुमिनियम आक्साईड — Al₂O₃2SiO₂.2H₂O

50.हरा कसीस — फैरिक सल्फेट — Fe₂(SO₄)₃

विधान परिषद

● विधान परिषद
- राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह
- घटनेचे कलम 169 विधानपरिषदेची स्थापना किंवा रद्द करण्याशी संबंधित आहे: संबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने (2/3) असा ठराव पारित करावा लागतो आणि हा ठराव संसदेत साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो.
-------------------------------------
● पात्रता
- उमेदवार भारताचा नागरिक असावा
- त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
- संसदेने ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक
-------------------------------------
● सदस्य संख्या
- कमीत कमी 40 (J&K: 36) तर जास्तीत जास्त संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतके सदस्य
- एक तृतीयांश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात (स्थायी सभागृह)
- सदस्याचा कालावधी 6 वर्षांचा असतो
--------------------------------------
● रचना: कलम 171
[सदस्य: मतदार संघ: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील संख्या]
- 1/12 सदस्य: पदवीधर मतदारसंघातून: 7 सदस्य
- 1/12 सदस्य: शिक्षक मतदारसंघातून: 7 सदस्य
- 1/6 सदस्य: राज्यपाल नियुक्त: 12 सदस्य
- 1/3 सदस्य: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून: 26 सदस्य
- 1/3 सदस्य: विधानसभा सदस्य निवडून देतात: 26 सदस्य
■ विधानपरिषदेच्या गणपूर्तीसाठी 1/10 सदस्यांची आवश्यकता असता.
--------------------------------------
● विधानपरिषद असलेली राज्ये
[राज्याचे नाव आणि सदस्य संख्या]
- उत्तर प्रदेश (100)
- महाराष्ट्र (78)
- बिहार (75)
- कर्नाटक (75)
- आंध्र प्रदेश (50)
- तेलंगणा (40)
- जम्मू-काश्मिर (36)
■ ओरिसा हे विधानपरिषद स्थापन करणारे देशातील आठवे राज्य ठरले आहे.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके


♻️भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक म्हणजेच क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. आज त्यांची (17 फेब्रुवारी 1883) पुण्यतिथी, या निमित्त जाणून घेऊ त्यांच्या विषयी माहिती.

फडक्यांचे मूळ घराणे कोकणातील केळशी (रत्नागिरी) येथील. मात्र शिरढोण (रायगड) गावी फडके कुटुंबाचे नंतर वास्तव्य झाले. वासुदेव यांचा जन्म (4 नोव्हेबेर 1845) शिरढोण येथे झाला.

सातव्या वर्षापासून त्याच्या शिक्षणास सुरुवात झाली. प्राथमिक शिक्षण शिरढोण येथे झाले. 1855 - 60 या वर्षांत माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले. वासुदेवाने पाचवीनंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली.

पहिली नोकरी जी.आय्. पी. रेल्वेत केली. वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली नोकरी सुटली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही.

शेवटी 1863 मध्ये वासुदेव बळवंत लष्कराच्या हिशेबी खात्यात आले. मुंबईहून त्यांची बदली 1865 ला पुणे येथे झाली, आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली. वासुदेव बळवंताची वृत्ती अत्यंत संवेदनशील.

वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही, तेव्हा वासुदेव बळवंतांनी वरिष्ठांपर्यंत आपली तक्रार नोंदविली. त्यांच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लावणारी ही महत्त्वाची घटना.

श्रीशैलम् येथील मल्लिकार्जुनास आत्मसमर्पण करण्याचे त्यांनी ठरविले. (17 एप्रिल 1879). त्याच दिवशी वासुदेव बळवंतांनी आपल्या आत्मचरित्रलेखनास सुरुवात केली.

विजापूर जिल्ह्यातील देवर नावडगी या गावी एका बौद्ध विहारात त्यांना निद्रिस्त अवस्थेत त्यांच्या काही अनुयायांसह पकडण्यात आले. (21 जुलै 1879). पुणे येथे त्यांच्यावर खटला चालविण्यात आला.

न्या. न्यूनहॅम यांनी त्यांना जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा फर्मावली. पुढे त्यांची रवानगी 1880 च्या जानेवारीत एडनच्या तुरुंगात झाली. तेथून आत्महत्या करण्याचा व पळून जाण्याचा वासुदेव बळवंताचा प्रयत्न फसला.

तुरुंगातील हाल, एडनची उष्ण हवा यांमुळे त्यांची प्रकृती बिघडली, आणि क्षयरोगाने त्यांना पछाडले. त्यातच त्यांनी अन्नग्रहण सोडले. ते एडन येथील कारावासातच मरण पावले.

भारतात त्यांनी पहिल्यांदाच सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवली. ही सशस्त्र उठावाची चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभर पसरली. म्हणून त्यांना ‘लढाऊ राष्ट्रवादाचे जनक’ म्हणतात.

आंदोलने आणि महात्मा गांधी.


🅾स्वातंत्र्याच्या आंदोलनाची भारतीय स्वातंत्र्याची गांधीयुगाची ही सुरुवात होती.

🅾१९१९मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली. महात्मा गांधी काँग्रेसचे महासचिव झाले. जगाच्या पाठीवर कुठेही एकाचवेळी, एकाच उंचीचे इतके मोठे नेते स्वातंत्र्याच्या चळवळीत हातात हात घालून लढत आहेत, असा एकही देश नाही, हे भारताने दाखवले.

🅾महात्माजींच्या पाठोपाठ सरदार पटेल, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्रप्रसाद अशी नेतृत्वाची एक रांग या देशात निर्माण झाली. आज असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या जिल्हा समित्या महात्माजींनी स्थापन केलेल्या आहेत. केवळ भारतीय स्वातंत्र्याची लढाई न लढता सामाजिक समतेचा आग्रह हा महात्माजींच्याच नेतृत्वाने काँग्रेसला दिलेला मंत्र होता. जातीभेदाविरुद्धची लढाई, दारूबंदीचा आग्रह हे काँग्रेसचे त्यावेळचे कार्यक्रम होते.

🅾गांधीजींच्या नेतृत्वामुळेच अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे एक मोठे तत्त्वज्ञान जगाला काँग्रेसनेच दिले. गांधीजींच्या नेतृत्वाने सगळे जग स्तिमित झाले.

🅾१९३०चा मिठाचा सत्याग्रह, १९४२चा ‘चले-जाव’ आंदोलनाचा लढा, हे सगळे काँग्रेसच्या इतिहासातले देदीप्यमान टप्पे आहेत. त्याहीपेक्षा ज्याला ‘काँग्रेस संस्कृती’ असे म्हटले जाते, ती ‘काँग्रेस संस्कृती’ म्हणजे सर्व जातीधर्माच्या समुदायाने हातात हात घालून देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा.

🅾गंधाचा टिळा कपाळावर लावून कट्टर हिंदू असलेले मदनमोहन मालवीय, मौलाना अबुलकलाम आझाद यांच्या हातात हात घालून स्वातंत्र्यासाठी लढले आणि पारशी असलेले वीर नरिमन या दोघांच्या बरोबर राहिले. खान अब्दुल गफार खान त्यांच्या मागे उभे होते.

🅾पुढे गांधी, नेहरू, राजेंद्रप्रसाद होते. ही ती काँग्रेस संस्कृती आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन स्वातंत्र्याचा लढा लढायचा आणि स्वातंत्र्यानंतर सर्व जातीधर्माच्या सहभागाने देशाची बांधणी करायची, हीच काँग्रेस संस्कृती आहे. हा देश एका जातीचा, एका धर्माचा कधीही होऊ शकत नाही, हाच काँग्रेसचा विचार आहे.

इतिहास

१)  १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट
२)  १८२२ - कुळ कायदा
३)  १८२९ - सतीबंदी कायदा
४)  १८३५ - वृत्तपत्र कायदा
५)  १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६)  १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा
७)  १८५८ - राणीचा जाहीरनामा
८)  १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट
९)  १८६० - इंडियन पिनल कोड
१०)  १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११)  १८७०- आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२)  १८७८ - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३)  १८८२ - देशी वृत्तपत्र कायदा
१४)  १८८३ - इलबर्ट बिल कायदा
१५)  १८८७ - कुळ कायदा
१६)  १८९२ - कौन्सिल अॅक्ट
१७)  १८९९ - भारतीय चलन कायदा
१८)  १९०१ - पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९)  १९०४ - भारतीय विद्यापीठ कायदा
२०)  १९०४ - प्राचीन वस्तुजतन कायदा
२१)  १९०४ - सहकारी पतसंस्था कायदा
२२)  १९०९ - मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३)  १९१९ - मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४)  १९१९ - रौलेक्ट कायदा
२५)  १९३५ - भारत सरकार कायदा
२६)  १९४४ - राजाजी योजना
२७)  १९४५ - वेव्हेल योजना
२८)  १९४५ - त्रिमंत्री योजना
२९)  १९४७ - माउंटबॅटन योजना
३०)  १९४७ - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

प्राकृतिक भूगोल -भुरूपे

✍ प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेली भूरूपे (Landform associated with Fault) : भूपृष्ठात ताण व दाब निर्माण होत असताना खडकांना तडे जातात किंवा भेगा पडतात व भूकवच दुभंगते. या वेळी भूकवचात ऊध्र्वगामी, अधोगामी व क्षितिजसमांतर हालचाल होते. या प्रकारांमुळे भूपृष्ठावर विविध भूरूपे निर्माण होतात. प्रस्तरभंगामुळे पुढील भूरूपे निर्माण होतात-

१) गट पर्वत किंवा विभंग पर्वत (Block Mountain): ज्या वेळी भूकवचाला समोरासमोर दोन समांतर भेगा पडतात, त्या वेळी काही ठिकाणी दोन भेगांच्या दरम्यान असलेला भूकवचाचा भाग वर उचलला जातो. अशा उंच भागास गट पर्वत किंवा विभंग पर्वत असे म्हणतात. उदा. तिबेटचे पठार, ब्राझीलचे पठार, सातपुडा पर्वत, मध्य युरोपातील व्हासजेस, ब्लॉक फॉरेस्ट, संयुक्त संस्थानातील पश्चिमेकडील सिएरा, नेवाडा पर्वत इत्यादी भूरूपे या प्रकारामुळे निर्माण झाली आहेत.

2) खचदरी (Rift Valley): ज्या वेळी भूकवचाला समोरासमोर दोन समांतर भेगा पडतात, त्या वेळी काही ठिकाणी दोन भेगांच्या दरम्यान असलेला भूकवचाचा भाग खाली खचून काही वेळेस अतिखोल, सपाट तळ व अरुंद दऱ्या निर्माण होतात. अशा प्रकारच्या खोलगट भागांना खचदरी असे म्हणतात.
प्रस्तरभंग क्रमाक्रमाने खाली खचतात, त्यातून खचदऱ्या निर्माण होतात. काही वेळा अंतर्गत भागात दोन्ही बाजूंनी ताण पडतो व बाजूचे दोन्ही भूभाग वर उचलले जातात, मध्य भाग खाली खचतो व खोल दरी निर्माण होते.

🌸 हवामानशास्त्र :

✍ यूपीएससीची प्रारंभिक व मुख्य परीक्षा तसेच राज्यसेवेची मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर परीक्षांच्या दृष्टीने हवामानशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपण या घटकातील महत्त्वाचे उपघटक अभ्यासणार आहोत.

✍ समभार रेषा : सारखाच दाब असणारे ठिकाण किंवा प्रदेश ज्या रेषेने जोडले जातात, त्यांना समभार रेषा असे म्हटले जाते.

✍ समताप रेषा (Isotherm): समान तापमान असणारी ठिकाणे नकाशावर ज्या रेषेने जोडली जातात, त्यांना समताप रेषा असे म्हणतात.

✍ समवृष्टी रेषा (Isoneph): समान पर्जन्य असणारी ठिकाणे नकाशावर ज्या रेषेने जोडली जातात, त्यांना समवृष्टी रेषा असे म्हणतात.

✍ समअभ्राच्छादित रेषा : एखाद्या विशिष्ट वेळी समान समअभ्राच्छादित असणारी ठिकाणे नकाशावर ज्या रेषेने जोडली जातात, त्यांना समअभ्राच्छादित रेषा असे म्हणतात.

✍ हवेचे तापमान (Air Temperature):तापमानाचे वितरण खालील दोन प्रकारे करतात- तापमानाचे दैनिक व वार्षकि वितरण व तापमानाचे भौगोलिक वितरण.