चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.चीनमध्ये सर्वच रुग्णालय तुडूंब भरले असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.त्यात महिला,मुलांचा आक्रोश,जमिनीवर मृतदेहांची रास पडली आहे.त्यामुळे भारतासह संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या व्हेरिएंटच्या BF.7 या सब व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार माजवला असून, भारतातही या सब व्हेरिएंट तीन रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
भारतात नवीन कोरोना व्हायरसच्या BF.7 चे दोन रूग्ण समोर आले आहे.त्यात गुजरातमध्ये दोन तर एक रूग्ण ओडिशातून समोर आला आहे. याआगोदर यूएस,यूके आणि बेल्जियम,जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह इतर अनेक देशांमध्ये या कोरोना व्हायरसचे व्हेरिएंटचे रूग्ण आधीच आढळून आले आहेत.
जागतिक लेवलवर वाढत असलेल्या नव्या कोरोना व्हायरस मुळे बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत कोविड रूग्णांमध्ये आतापर्यंत वाढ झालेली नसली तरी,नव्या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्हीके पॉल यांनी नागरिकांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
चीनमधून येणाऱ्यांची चौकशी..
चीनमधील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आरोग्य मंत्रालयाने चीनमधून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.विमानतळांवर आजपासून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आजपासून विमानतळांवर रॅन्डम कोरोना चाचाणी केली जाणार आहे,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
काळजी घ्या....सुरक्षित रहा...!!
--------------------------------------
जन हितार्थ जारी:
▼
No comments:
Post a Comment