Monday, 14 November 2022

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum Porifera)

🔸 हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना ऑस्टीया' आणि 'ऑस्कुला म्हणतात.

🔸 हे जलवासी प्राणी असून त्यांतील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात.

🔸 बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते

🔸 या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात,

🔸 हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून 'स्थांना 'स्थानबद्ध प्राणी' (Sedentary animals) म्हणतात.

🔸 ह्यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा / शुकिकांचा (Spicules) किंवा स्पोंजिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनिट किंवा सिलीकाच्या बनलेल्या असतात.

🔸 ह्यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषकद्रव्यांचे से भक्षण करतात. ऑस्टीया नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले जाते आणि ऑस्क्युला' नावाच्या छिद्रांद्वारे बाहेर सोडले जाते.

🔸 त्यांचे प्रजनन मुकुलायन यो अलैंगिक पद्धतीने किंवा / आणि लैंगिक पद्धतीने होते. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते

✅ उदाहरणे :  सायकॉन, यूस्पोंजिया (आंघोळीचा स्पंज), हायालोनिमा, वुप्लेक्टेल्ला, इत्यादी.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...