अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवसात आपले संविधान लिहून पूर्ण केले. व
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकारले.
खऱ्या अर्थाने संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडरांनी आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय मिळवून दिला,
विचार, अभिवेक्ती, विश्र्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य मिळून दिले,
दर्जा ची व संधीची समानता मिळवून दिली,
बंधुता निर्माण केली.
मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य , राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिली..
सर्व नागरिकांना समान अधिकार दिला.
संविधान रूपी आपल्याला त्यांनी सोन्याची तिजोरी मिळवून दिली.
हे सर्व आपल्याला सहज मिळालेलं नाही ये..
या मागे अनेक स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांती विरांचे, राष्ट्र विरांचे योगदान आहे त्यांचा संघर्ष आहे.
यांनी दिलेले योगदान, त्यांचे मूल्य आपण जोपासले पाहिजे.
ते आत्मसात केले पाहिजे.
व त्या संविधानिक मूल्यांना समोर ठेऊन त्या दिशेने आपण वाटचाल केलीच पाहिजे.
एक जागरूक नागरिक म्हणून आपले हक्क समजलेच पाहिजे.
आणि त्या साठी महत्वाचे म्हणजे संविधान हे सर्वांनी वाचलेच पाहिजे.
तरच आपला देश खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील सुदृढ लोकशाही असलेला देश होईल.
No comments:
Post a Comment