Sunday, 9 October 2022

Nobel Prize for Literature 2022

 जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अ‍ॅनी एर्नो यांना जाहीर झाला आहे.

अ‍ॅनी अर्नोक्स यांनी फ्रेंच, इंग्रजी भाषेत कांदबरी, लेख, नाटके आणि चित्रपटांसाठी लेखन केले आहे. अ‍ॅनी यांनी साहित्यातून सामाजिक बंधने उलगडून दाखविल्याबद्दल त्यांना या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असल्याने  त्यांच्या साहित्यात याचा प्रभाव दिसून येतो. अ‍ॅनी एर्नो यांनी 1974 मधील Les Armoires vides (Cleaned Out) या आत्मचरित्रपर कांदबरीद्वारे साहित्यिक प्रवासाला सुरुवात केली. 1984 मध्ये त्यांना  La Place (A Man's Place) या कादंबरीसाठी रेनॉडॉट पुरस्कार मिळाला. 

दोन वेळेस साहित्यातील नोबेल पुरस्कार स्थगित: 1901 पासून नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली. नोबेल पुरस्काराच्या इतिहासात फक्त दोन वेळेस साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही. 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे पहिल्यांदा पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला होता. तर, दुसऱ्यांदा 2018 मध्ये स्वीडिश अकॅडमी च्या परीक्षक सदस्या कॅटरिना यांचे पती आणि फ्रेंच फोटोग्राफर जेन क्लोड अरनॉल्ट यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यामुळे पुरस्कार स्थगित करण्यात आले.

पुरस्काराचे स्वरुप काय?

सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिशी क्रोनर ( जवळपास 8.20 कोटी रुपये) असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्वीडिशी क्रोनर हे स्वीडनचे चलन आहे.

No comments:

Post a Comment