GDP म्हणजे काय ? :-
GDP - Gross Domestic Product (स्थूल देशांतर्गत उत्पादन)
व्याख्या :- एका वर्षाच्या काळात देशाच्या सीमेतंर्गत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा यांच्या मुल्याची बेरीज म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पाद होय.
देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न जीडीपी मध्ये मोजले जाते.
जीडीपीमुळे एखादया देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. भारतात जीडीपी हा स्थिर किंमतीला आणि चालू किंमतीला मोजला जातो.
सध्या स्थिर किमतीला जीडीपी मोजण्यासाठी 2011-12 हे आधारभूत वर्ष मानण्यात येते.
No comments:
Post a Comment