Thursday, 9 March 2023

पहिली पंचवार्षिक योजना (First Panchwarshik Scheme)



कालावधी : 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956.

मुख्य भर : या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.

प्रतिमान : हेरोल्ड-डोमर चे प्रतिमान या योजनेत वापरण्यात आले.

योजनेचे उपनाव : पुंनरुस्थान योजना.

अपेक्षा वृद्धी दर : 2.1%.

प्रत्यक्षा वृद्धी दर : 3.6%.



प्रकल्प :


दामोदर खोरे विकास प्रकल्प (झारखंड-प.बंगाल, दामोदर नदीच्या खोर्यात)

भाक्रा-नानगल प्रकल्प (हिमाचल प्रदेश–पंजाब, सतलज नदी)

कोसी प्रकल्प (बिहार, कोसी नदीवर)

हिराकुड योजन(ओरिसा, महानदी)


कारखाने :


सिंद्री (झारखंड) खत कारखाना

चित्तरंजन (प.बंगाल) रेल्वे इंजिन कारखाना

पेरांबूर (तमिळनाडू) रेल्वे डब्यांचा कारखाना

HMT(बंगलोर)

हिंदुस्तान (पिंपरी,पुणे)


मूल्यमापन :


योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण, योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्षे कमी होती.

अन्नधान्याचे उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढले.

मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरवात.

राष्ट्रीय उत्पन्न 18% नी तर दरडोई उत्पन्न 11% नी वाढले.



विशेष घटनाक्रम :


8 मे, 1952 पासून ओधोगिक विकास व नियमन अधिवेशन 1951 लागू करण्यात आला.

2 ओक्टोंबर, 1952 रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

हातमाग उधोगाचा विकास करण्यासाठी 1952 मध्ये अखिल भारतील हातमाग बोर्डची स्थापना करण्यात आली .

1955 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारसीनुसार (गोरवाल समिती) एम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.

जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापन करण्यात आले, ज्याने मार्च 1955 मध्ये आपले कार्य सुरू केले.


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:

Post a Comment