११ ऑक्टोबर २०२२

एक शब्दाबद्दल शब्दसमूह

कृतज्ञ : उपकार जाणणारा

असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

कवयित्री : कविता करणारी

तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
   पाहणारा

तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

दानशूर : खूप दानधर्म करणारा

दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

गुराखी : गुरे राखणारा

निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

अंगण : घरापुढील मोकळी जागा

गवंडी : घरे बांधणारा

चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

RRB NTPC Exams -2021 (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )

#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा #2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाध...