भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला.
१८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले.
भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता. त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.
मिरात-उल्-अखबार
राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले.
लवकरच १८२२ च्या ‘प्रेस अॅक्ट’च्या निषेधार्थ त्यांनी अखबार बंद केले.
संवाद कौमुदीच्या आधीपासून कलकत्ता येथे जाम-ए-जहाँनुमा (१८२२) व शम्सुल अखबार ही वृत्तपत्रे फार्सी भाषेत चालू होती.
दिग्दर्शन: श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.
समाचार दर्पण: २३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.
सोमप्रकाश: पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.
तत्त्वबोधिनी पत्रिका: देवेंद्रनाथ टागोर यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.
सुलभ समाचार : केशवचंद्र सेन (१८७८).
अमृत बझार पत्रिका : मोतीलाल घोष यांनी १८६८ मध्ये सुरु केले.
No comments:
Post a Comment