१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर -- पांढ-या पेशी
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर -- कान
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सुर्यप्रकाश
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- न्यूटन
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर -- नायट्रोजन..
No comments:
Post a Comment