दर्पण
मराठीतील पहिले वृत्तपत्र
दि. ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून सुरु केले.
दर्पण प्रारंभी पाक्षिक होते. ४ मे १८३२ पासून ते साप्ताहिक झाले.
या पत्रात इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत मजकूर छापला जात असे.
जांभेकर यांना संपादनाच्या कार्यात भाऊ महाजन (ऊर्फ गोविंद विठ्ठल कुंटे) यांचे सहकार्य लाभत असे.
बेअदबी प्रकरणाची झळ लागून दर्पण बंद पडले (१८४०). ते बंद पडल्यावर त्याच्या चालकांनी युनायटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल हे नियतकालिक सुरु केले.
दिग्दर्शन
जांभेकरांनी १८४० च्या मे महिन्यात दिग्दर्शन हे मराठी नियतकालिक सुरु केले.
ते साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांना वाहिलेले भारदस्त मासिक होते.
ज्ञानोदय : जून १८४२ मध्ये अहमदनगर येथे ख्रिस्ति मिशनऱ्यांनी ज्ञानोदय हे मासिक सुरु केले. १८७३ मध्ये ज्ञानोदय साप्ताहिक झाले. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या या साप्ताहिकाचे रेव्हरंड हेन्री बॅलंटाइन हे पहिले संपादक होते.
No comments:
Post a Comment