Sunday, 9 October 2022

वाक्यप्रचार व त्याचे अर्थ

दातांच्या कन्या करणे   : अनेक वेळा विनंती करून सांगणे.

दाती तृण धरणे  : शरणागती पत्करणे.

दत्त म्हणून उभे राहणे  : एकाएकी हजर होणे.

दातखिळी बसणे  : बोलणे अवघड होणे.

द्राविडी प्राणायाम करणे   : सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

दात ओठ खाणे :  द्वेषाची भावना दाखवणे.

दोन हातांचे चार हात होणे  : विवाह होणे.

दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे  :  दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.

दातास दात लावून बसणे  : काही न खातो उपाशी राहणे.

दुःखावर डागण्या देणे : झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे.

धारातीर्थी पडणे   : रणांगणावर मृत्यू येणे.

धाबे दणाणणे  : खूप घाबरणेे.

धूम ठोकणे   : वेगाने पळून जाणे.

धूळ चारणे :  पूर्ण पराभव करणे.

नजरेत भरणे  : उठून दिसणे.

नजर करणे  : भेटवस्तू देणे.

नाद घासणे :  स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे.

नाक ठेचणे  : नक्शा उतरवणे.

नाक मुरडणे  : नापसंती दाखवणे.

नाकावर राग असणे :  लवकर चिडणे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...