Thursday 13 October 2022

मुलायम सिंह यादव

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे १० ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेश सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

त्यांच्या पार्थिवावर इटावा जिल्ह्यातील सैफई या मूळ गावी पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलायम 1967 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. ते आठ वेळा आमदार आणि सात वेळा खासदार होते. ते तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि दोनदा केंद्रात मंत्री होते. नेताजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ते सध्या लोकसभेत मैनपुरी मतदारसंघातून खासदार होते.
  

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...