०७ ऑक्टोबर २०२२

प्रार्थना समाजाची तत्त्वे

१) परमेश्वर एक आहे. तो सर्व विश्वाचा निर्माता आहे. तो चिरंतन, अनाकलनीय व निराकार आहे. तो सर्वशक्तिमान, दयाळू व पवित्र आहे.

२) सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गाने गेल्यानेच तो प्रसन्न होतो.

३)परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही. मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

४) मूर्तिपूजा परमेश्वराला मान्य नाही.

५) परमेश्वर अवतार घेत नाही. तसेच परमेश्वराने कोणतेही धर्मग्रंथ लिहिले नाहीत.

६) सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत, म्हणून सर्वांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज

👇👇👇👇👇👇👇 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 👉 १ मे १९६० महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मबई  महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव? 👉 नागपूर  म...