Monday, 10 October 2022

लक्षात ठेवा


               
भारतीय घटनेच्या तरतुदींनुसार महाराष्ट्राच्या मंत्रिपरिषदेत मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांची कमाल संख्या मर्यादा .... इतकी आहे.
- ४३

निवडणूक यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक या नात्याने तालुका स्तरावरील जबाबदारी पार पाडतो ....
- तहसीलदार

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हा धिकाऱ्यांवर असून जिल्हाधिकारी हाच असतो.
- जिल्हा दंडाधिकारी

तालुक्यातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी तहसील दारावर असून तहसीलदार हाच .... असतो.
- तालुका दंडाधिकारी

महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे केली गेली. कोणत्या वर्षी ?
- इ.स. १९५५

.... या प्राचीन भारतीय राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष उत्तेजन दिले होते, असे इतिहास सांगतो.
- चोल

'मनुस्मृती' व 'नारदस्मृती' यांमध्ये ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतसदृश .... या संस्थांचा उल्लेख आला आहे.
- न्यायपंचायत

आधुनिक भारताच्या इतिहासात लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेबाबत केलेले प्रयत्न व त्याने संमत केलेला इ. स. १८८२ चा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा लक्षात घेता त्यास यथार्थतेने म्हटले जाते ....
- स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक

स्वातंत्र्योत्तर काळात व्यवस्थेचे स्वरूप व कल्पना सुनिश्चित करण्यासाठी मध्यवर्ती शासनाने १६ जानेवारी, १९५७ रोजी .... यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
- बलवंतराय मेहता

बलवंतराय मेहता समितीने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणावर भर दिला व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेची शिफारस केली. बलवंतराय मेहता समितीने आपला अहवाल केंद्र शासनाला केव्हा सादर केला ?
- २४ नोव्हेंबर, १९५७

No comments:

Post a Comment