Tuesday, 17 September 2024

हिमालय

 

ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. संस्कृत भाषेत हिमालय म्हणजे बर्फ (हिम) जेथे वास करते ते स्थान.

हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सर्वच ८,००० मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत. 

माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची ८,८४८ मीटर इतकी आहे. त्याखालोखाल के२ व कांचनगंगाचा क्रमांक लागतो. ह्या पर्वतरांगेची लांबी २,४०० कि.मी. पेक्षाही जास्त आहे.

भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन,भूतान या देशांमधून जाते.

हा पर्वत भारतीय उपखंडाच्या हवामानावर नियंत्रण राखतो. हिमालयाच्या प्रभावाने भारतीय उपखंडावर मोसमी पाऊस पडतो तर त्याच्या उंचीमुळे उत्तरेकडील अतिथंड वारे रोखले जाऊन भारतीय उपखंड सर्वकाळ उष्ण/उबदार राहण्यास मदत होते.

हिमालयात अनेक नद्या उगम पावतात ह्या नद्या भारत, पाकिस्तान,बांगलादेश व चीनमधील जवळपास १५० कोटीहून अधिक लोकसंख्या म्हणजे ३०-३५ टक्के मानवांच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. 

गंगा,ब्रह्मपुत्रा,सिंधू या हिमालयातील महत्त्वाच्या नद्या आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...