Wednesday, 5 October 2022

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळ


केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळ”च्या नियमांसह त्याच्या स्थापनेसंबंधी अधिसूचना जाहीर केली आहे.

या नियमांद्वारे मंडळासाठी रचनात्मक नियम, मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या पात्रतेचे निकष, निवड प्रक्रिया, पदाचा कार्यकाळ राजीनामा घेणे अथवा निवड करण्याची प्रक्रिया, मंडळाचे अधिकार आणि कार्ये, मंडळाच्या बैठका या विषयीच्या तरतुदी नमूद करण्यात आल्या आहेत.

मंडळाचे मुख्यालय राष्ट्रीय राजधानी प्रदेशात (दिल्ली) येथे असेल आणि मंडळ भारतातील इतर ठिकाणी कार्यालये स्थापन करू शकेल. मंडळात एक अध्यक्ष आणि कमीत-कमी तीन आणि जास्तीत-जास्त सात सदस्य केंद्रीय सरकारद्वारे नियुक्त केले जातील.

मंडळावर रस्ता सुरक्षा, नाविन्यपूर्ण आणि सुलभ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आणि वाहतूक आणि मोटर वाहनांसाठी नियम करण्याची जबाबदारी असेल.

No comments:

Post a Comment