Friday 14 October 2022

मराठी वृत्तपत्र


मित्रोदय:  पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय. ते १८४४ मध्ये निघाले;

ज्ञानप्रकाश

१२ फेब्रुवारी १८४९ रोजी ज्ञानप्रकाश सुरु झाले  .

कृष्णाजी त्रिंबक रानडे

१९०९ मध्ये ‘भारत सेवक समाजा’ने हे वृत्तपत्र चालविण्यास घेतले.

त्यानंतर नेमस्तांचे मुखपत्र अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली.


ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होण्याचा मान विख्यात मराठी कादंबरीकार हरी नारायण  आपटे यांना मिळाला.

‘सत्य, सौख्य आणि ज्ञान’ हे त्याचे ब्रीदवाक्य होते.

महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ कृष्ण गोखले यांसारख्या नामवंत व्यक्ती ज्ञानप्रकाशमधून लेखन करीत.

इंदुप्रकाश

जानेवारी १८६२ पासून इंदुप्रकाश हे वृत्तपत्र साप्ताहिकरुपात मुंबईहून प्रसिद्ध होऊ लागले.

ते काढण्यात लोकहितवादींचाच पुढाकार होता.

इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते, तर मराठी विभागाचे संपादक म्हणून जनार्दन सखाराम गाडगीळ काम पाहत.

No comments:

Post a Comment