Monday, 3 October 2022

लक्षात ठेवा


           

१) भारतातील अठ्ठाविसावे राज्य ......
- झारखंड

२) १ ऑक्टोबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेले .... हे भाषिक तत्त्वावरील भारतातील पहिले राज्य होय.
- आंध्र राज्य

३) २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगाणा हे भारतातील २९ वे राज्य निर्माण झाले. तेलंगाणा प्रदेशाचा समावेश असलेले मूळ आंध्र प्रदेश राज्य केव्हा आकारास आले होते?
- १ नोव्हेंबर, १९५६

४) .... हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असून त्याच्या नावाने राज्याचे कार्यकारी आदेश काढले जातात.
- राज्यपाल

५) राज्यपाल त्याचे कार्यकारी अधिकार थेट किंवा दुय्यम अधिकाऱ्यांद्वारा वापरू शकतो, असे कलम १५४ मध्ये म्हटले आहे. दुय्यम अधिकारी या संज्ञेत कोणाचासमावेश होतो ?
- सर्व मंत्री व मुख्यमंत्री

१) घटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.
- राष्ट्रपती

🔹२) राज्याच्या अॅडव्होकेट जनरलची नेमणूक कोणाकडून केली जाते ?
- राज्यपाल

३) .... ची संमती मिळाल्याशिवाय विधेयकाचे राज्य शासनाच्या कायद्यात रूपांतर होत नाही.
- राज्यपाल

४) घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे घटक राज्याच्या .... राजीनामा होय.
- संपूर्ण मंत्रिमंडळाचा

५) महाराष्ट्राच्या विधानसभेची व विधानपरिषदेची सदस्य संख्या ....
- २८८ व ७८

No comments:

Post a Comment