Tuesday, 15 November 2022

रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते

1)  रक्तद्रव ( Plasma )
2) रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)

रक्तद्रव (Plasma)

अ.)  रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी,
6 ते 8% प्रथिने
1 ते 2% असेंद्रिय क्षार
व इतर घटक असतात.

आ.) अल्ब्युमिन - संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते.

इ.)  ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.

ई) फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.

उ)  असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू ठेवतात. कार्याचे नियंत्रण

रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)

1. लोहित रक्तपेशी (RBC)
आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो.

रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष RBC असतात. RBC ची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते127 दिवस जगतात.

2. श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC)

आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त, रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 5000-10,000 पांढऱ्या पेशी असतात

या पेशींचे 5 प्रकार आहेत -
बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील,
मोनोसाईट्स लिम्फोसाईट्स

पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते.

कार्य-
पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.

3. रक्तपट्टीका (Platelets)

या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात.
रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात.

कार्य - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...