11 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय बालिका दिन
संबंधित महत्वाची माहिती
दरवर्षी 11 ऑक्टोबर हा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश मुलींच्या सक्षमीकरणाला चालना देणे आणि मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता पसरवणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा आहे.
या वर्षाची मुख्य थीम म्हणजेच 2022 आंतरराष्ट्रीय बालिका दिन ही 'आमचा काळ आता आमचे हक्क, आमचे भविष्य' आहे.
आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2022 निमित्त, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नवी दिल्ली येथे "बेटियां बने कुशल" नावाच्या मुलींसाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. ही परिषद बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment