Saturday, 1 October 2022

सम संख्यांचे गुणधर्म


सर्व सम संख्यांना 2 ने नि:शेष भाग जातो.

क्रमागत सम संख्यात 2 था फरक असतो.

कोणत्याही नैसर्गिक संख्यांची दुप्पट सम संख्या असते.

दोन किंवा जास्त सम संख्याची बेरीज, गुणाकर, वजाबाकी, ही सम संख्याच असते.

कोणत्याही सम संख्येत एक मिळवल्यास किवा वजा केल्यास विषम संख्या मिळते.

पूर्णांक संख्या ( I) 

धन संख्या, ॠण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात.

उदा:

-3,-2,-1

0

1,2,3

" 0 "हा मध्यवर्ती बिंदू आहे.

1) सर्वात मोठी ॠणपूर्णांक संख्या = -1
2) सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही.

  पूर्ण संख्या ( W)  

0,1,2,3,--------------या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात.
सर्वात लहान पूर्ण संख्या - 0
सर्वात मोठा पूर्ण संख्या सांगता येत नाही.

नैसर्गिक संख्या ( N)

1,2,3,4,------------या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.
ह्या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून यांना मोजसंख्या म्हणतात.
नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्या येते.
नैसर्गिक संख्यांचा गुणाकर नैसर्गिक संख्या येतो.
सर्वात लहान नैसर्गिक संख्या - 1

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...