पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे गुरुवारी भव्य उद्घाटन करण्यात आले.
मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या भव्य सोहळय़ात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे महासचिव राजीव मेहता उपस्थित होते. त्यांच्यासह ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पीव्ही सिंधू, नेमबाज गगन नारंग यांचीही या सोहळय़ाला उपस्थिती होती.
महाराष्ट्राची विजयी घोडदौड :
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजी, रग्बी, टेनिस या खेळांमध्ये विजयी घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी रग्बी सेव्हन्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी विजयी सुरुवात केली. नेमबाजीमध्ये रुद्रांक्ष पाटील आणि आर्या बोरसे यांनी सुवर्णपदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.
No comments:
Post a Comment