Saturday 1 October 2022

पहिली पंचवार्षिक योजना

कालावधी: १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६

मुख्य भरः या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.

प्रतिमान: या योजनेसाठी हेरॉड-डोमर प्रतिमानाचा वापर करण्यात आला.

योजना खर्च:
प्रस्तावित खर्चः २३७८ कोटी रू. वास्तविक खर्च: १९६० कोटी रू.
योजनेचे उपनाव: पुनरुत्थान योजना

उद्दिष्टे :

1.दुसऱ्या महायुद्धामुळे व भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरून भारतीय अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण करणे.

2.देशातील उपलब्ध साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन रोजगार वाढविणे व लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे.

3.अर्थव्यवस्थेतील चलन फुगवट्यावर नियंत्रण.

हाती घेण्यात आलेले प्रकल्प:

1.दामोदर खोरे विकास योजना (दामोदर नदीच्या खोऱ्यात, झारखंड-प.बंगालमध्ये)

2.भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेशपंजाब मध्ये).

3.कोसी प्रकल्प (कोसी नदीवर, बिहारमध्ये).

4.हिराकूड योजना (महानदीवर, ओरिसामध्ये) (वरील सर्व प्रकल्पांची आखणी अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित करण्यात आली होती. ते बहुउद्देशिय प्रकल्प आहेत.)

5.सिंद्री (झारखंड) येथे खत कारखाना

6.चित्तरंजन (प.बंगाल) येथे रेल्वे इंजीनाचा कारखाना M.पेरांबूर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना

8.HMT कारखाना बँगलोर येथे स्थापन

9.हिंदुस्तान अँटीबायोटिक्स: पिंपरी, पुणे

10.१९५२ पासून ‘समुदाय विकास कार्यक्रम'ची सुरूवात

मुल्यमापन:

1.योजना जवळजवळ सर्व बाबतीत यशस्वी झाली. कारणेi) योजना कालावधीत मान्सून अनुकूल होता. ii) योजनेची लक्ष्ये कमी होती.

2.अन्नधान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१५२) ६५.८ दशलक्ष टनांपर्यंत (१९५५-५६) वाढले.

3.मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जाच्या पायाभूत सोयींना सुरुवात.

4.आर्थिक वाढीचा दर: संकल्पितः २.१%, साध्यः ३.६%

5.योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोई उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. तसेच किंमतींचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला. (पहिली योजना ही आतापर्यंतची एकमेव योजना आहे, ज्यादरम्यान किंमतींचा निर्देशांक कमी झाली.)

No comments:

Post a Comment