Saturday, 15 October 2022

लक्षात ठेवा

इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली ....
- नाना शंकरशेठ

मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते.
- नाना शंकरशेठ

एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली.
- लोकहितवादी

अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले.
- दादोबा पांडुरंग

स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल.
- दादोबा पांडुरंग

दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी १८४४ मध्ये 'मानवधर्म सभा' या सभेची स्थापना केली. कोठे ?
- सुरत

दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे 'परमहंस सभे'ची स्थापना केली ....
- ३१ जुलै, १८४९

हिंदुधर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यांवर प्रकाश टाकणारी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहिली ....
- बाबा पद्मनजी

सन १८६७ मध्ये मुंबई येथे 'प्रार्थना समाजा'ची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या स्थापनेचे श्रेय विशेषत्वाने देण्यात येते .... यांना.
- आत्माराम पांडुरंग

.... रोजी मुंबईतील कोळीवाडा (मांडवी) येथील समारंभात जोतीराव फुले यांना 'महात्मा' ही पदवी दिली गेली.
- ११ मे, १८८८

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...