Friday 14 October 2022

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे


महाराष्ट्रातील नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.
जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे ‘सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय.
‘सिमुक’ हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.
सातवाहन ‘राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची रानी ‘नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.

चालुक्य हे वैष्णवपंथी होते, तरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते.
इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या र्हासानंतर ‘दंतीदुर्ग’ याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली.
राष्ट्रकूट घराण्यातील ‘कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले ‘वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले .
शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.
शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून ‘विद्याधर जीमुतवाहन’ हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूल स्थान होय.
चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक ‘कोल भिल’ हा होता.

यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.
अल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.
महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना ‘हसन गंगू बहामणी’ याने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.
बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले –
वर्हाडी – इमादशाही
अहमदनगर – निजामशाही
बिदर – बरीदशाही
गोवलकोंडा – कुतुबशाही
विजापूर – आदिलशाही
विजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने 1489 मध्ये स्थापना केली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...