Thursday 6 October 2022

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर फिनलँडनं पटकावला पहिला क्रमांक, तर भारत.

संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या वर्षी अर्थात २०२२ ची यादी तयार करताना एकूण १४६ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानावर आहेत.

सलग पाचव्या वर्षी फिनलँड अव्वल - या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे. फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्विडन, नॉर्वे, इस्त्रायल आणि न्यूझीलंड या ९ देशांचा क्रम लागतो. पहिल्या १० मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त एक बदल झाला असून ऑस्ट्रिया या यादीतून बाहेर गेला आहे. इतर देशांचा फक्त क्रम बदलला असून ते पहिल्या दहामध्ये कायम आहेत.

अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या स्थानी - दरम्यान, या यादीमध्ये अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या म्हणजेच १४६व्या स्थानी आहे. अफगाणिस्तानपाठोपाठ लेबेनॉन आणि झिम्बाब्वे हे देश सर्वात कमी आनंदी ठरले आहेत.

यादीमध्ये भारत कुठे - जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान मात्र बरचसं मागे आहे. १४६ देशांच्या यादीमध्ये भारत थेट १३६व्या क्रमांकावर म्हणजे शेवटून ११व्या क्रमांकावर आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...