Saturday, 1 October 2022

रा.गो.भांडारकर


प्राच्यविद्यासंशोधक संस्कृतचे प्रकांड पडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक व कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक. त्यांचे मुळ आडनाव पत्की; तथापि त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते म्हणून 'भांडारकर' हे नाव पडले

१८७४ साली लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत नाशिक शिलालेखासंबंधी त्यांचा निबंध वाचला गेला. १८८५ मध्ये जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पीएच्. डी. अर्पण केली. १८८६ साली व्हिएन्ना येथे 'क्राँग्रेस आँफ ओरिएंटॅलिस्टस' भरली, तिला भारतीय प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये १८७९ पर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठचे अधिछात्र व सिंडिकेटचे सदस्य म्हणून कामगिरी बजाविल्यानंतर ते कुलगुरु झाले. १९०४ मध्ये एल्एल्. डी. ही पदवी त्यांना मिळाली. 'रॉयल एशियाटिक सोसायटी', लंडन व मुंबई, 'जर्मन ओरिएंटल सोसायटी', 'अमेरिकन ओरिएंटल सोसायटी'; इटली येथील 'एशियाटिक सोसायटी', सेंट पीटर्झबर्ग येथील 'इंपिरिअल अकॅडमी आँफ सायन्स' इ. जगप्रसिद्ध संस्थांनी भांडारकरांना सदस्यत्व दिले. अनेक संस्कृत हस्तलिखितांसंबंधी त्यांनी संशोधनात्मक लेख लिहिले. प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली.पुणे डेक्कन सोसायटी मधे संस्कृत अध्यापण ही केले.

प्राचीन गृह्यसूत्रादी संस्कारमंत्रांतील जरुर तेवढाच भाग घेऊन उपनयन, लग्नादि गृह्यसंस्कारसमयी उपयोगी पडणारा 'संस्कारविधी' तयार केला. भक्तिपर कविता आणि पदे रचिली. या कामगिरीमुळे भांडारकर हे" प्रार्थनासमाजाचे वैचारिक संस्थापक "मानले जातात.

१९०३ मध्ये व्हाइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते सदस्य होते. १९०४-०८ ह्या कालखंडात प्रांतिक लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्येही ते होते. १९११ मध्ये भरलेल्या दिल्ली दरबारप्रसंगी त्यांना 'सर' हा किताब देण्यात आला. त्यांची वृत्ती नेमस्त होती.

अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन (१८८४), वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स (१९१३), ए पीप इनट् द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया(१९२०), कलेक्टेड वर्क्स ऑफ श्री. आर्. जी. भांडारकर (१९३३),मालती माधव ग्रंथाचे संपादन.

फक्त वि.रा.शिंदे हे एकमेव कर्ते मिशनरी म्हणून प्रार्थनासमाजास मिळाले. भांडारकरांनी त्यांना विलायतेस धर्मशिक्षणार्थ पाठविण्याच्या कामात पुढाकर घेतला होता.

खुप महत्वाचे -
'तुकाराम सोसायटी' (पुणे) मार्फत अभंगांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न झाला. ह्या चर्चेत भांडारकरांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. भांडारकर कीर्तनेही करीत.

रामकृष्णपंतांनी पुणे येथील 'प्राच्यविद्या संशोधन मंदिरा'स आपल्या ग्रथांचा व संशोधन पत्रिकांचा अनमोल. संग्रह देणगी म्हणून दिल्यामुळे, ही महत्त्वाची संस्था उभी  राहिली. हिच ती पुण्यातील "भांडारकर ईन्सटीट्युट"

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...