१७ ऑक्टोबर २०२२

2022 नोबेल शांतता पुरस्कार

2022 नोबेल शांतता पुरस्कार : बेलारुसच्या अॅलेस बिलियात्स्की तसेच रशिया & युक्रेनच्या मानवाधिकार संघटनेला जाहीर.

2022 साठीचा नोबेल शांतता पुरस्कार मानवधिकार हक्कांसाठी लढणारे वकिल बेलारुसचे ह्युमन अॅक्टिव्हीस्ट अॅलेस बिलियात्स्की (Ales Bialiatski) & रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला आहे. 

Nobel Peace Prize अर्थात नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसंच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात.

कोणत्याही दोन गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना दिला जातो.

गेल्या वर्षी (2021)रशियाचे दिमित्री मुराटोव्ह आणि फिलीपिन्सच्या मारिया रेसा या पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी
   

कसा आहे नोबेल पुरस्काराचा इतिहास?

नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो.

स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात.

अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता.

त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा.

अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात.

पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...