Monday, 3 October 2022

एका ओळीत सारांश, 02 ऑक्टोबर 2021


दिनविशेष

आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस - 2 ऑक्टोबर.

भारतात, गांधी जयंती - 2 ऑक्टोबर.

संरक्षण

01 ऑक्टोबर 2021 पासून भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (AOC-in-C) - एअर मार्शल अमित देव.

01 ऑक्टोबर 2021 पासून लष्करी परिचर्या सेवा (MNS) याचे अतिरिक्त महासंचालक - मेजर जनरल स्मिता देवराणी.

_ याने 01 ऑक्टोबर 2021 रोजी त्याचा 96 वा स्थापना दिवस साजरा केला - लष्करी परिचर्या सेवा (MNS).

30 सप्टेंबर 2021 पासून भारतीय हवाई दलाचे (IAF) प्रमुख (Chief of the Air Staff / CAS) - एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी.

01 ऑक्टोबर 2021 पासून भारतीय हवाई दलाचे (IAF) उप-प्रमुख (VCAS) - एअर मार्शल संदीप सिंग.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 02 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून 'सुदर्शन भारत परिक्रमा' (7,500 किलोमीटर लांब प्रवास) नावाने __ याच्या अखिल भारतीय कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला – नॅशनल सेक्युरिटी गार्ड (NSG).

पर्यावरण

जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या _ मधील 'किलाउआ' ज्वालामुखीचा 29 सप्टेंबर 2021 रोजी उद्रेक झाला - हवाई.

आंतरराष्ट्रीय

27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2021 या काळात ____ येथे भारत आणि अमेरिका यांच्यात औद्योगिक सुरक्षा करार शिखर परिषद आयोजित करण्यात आली - नवी दिल्ली.

30 सप्टेंबर 2021 रोजी, भारत आणि ____ या देशांनी 2022 वर्षाच्या अखेरीस देशांदरम्यानचा मुक्त व्यापार करार (FTA) रद्द करण्याचा निर्णय घेतला - ऑस्ट्रेलिया.

राष्ट्रीय

01 ऑक्टोबर 2021 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “स्वच्छ भारत अभियान – शहरी 2.0” आणि ____ यांचा प्रारंभ केला - अटल शहर पुनरुज्जीवन आणि परिवर्तन अभियान 2.0 (अमृत / AMRUT 2.0).

आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था (IFPRI), भारतीय लोकसंख्याशास्त्र संस्था (IIPS), UNICEF आणि आर्थिक विकास संस्था (IEG) यांच्या संयुक्त प्रयत्नातून _ याने 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ‘द स्टेट न्यूट्रीशन प्रोफाइल्स’ याचे अनावरण केले – नीती आयोग.

30 सप्टेंबर 2021 रोजी __ याने ‘लोक योजना मोहीम 2021 - सबकी योजना सबका विकास आणि व्हायब्रंट ग्राम सभा डॅशबोर्ड’ याचे अनावरण केले - केंद्रीय पंचायतराज आणि ग्रामीण विकास मंत्रालय.

_ याने "जिल्हा रुग्णालयांच्या कामगिरीतील सर्वोत्तम पद्धती" अहवाल प्रकाशित केला, जो आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि WHO इंडिया यांच्या सहकार्याचा परिणाम आहे - नीती आयोग.

असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASOOCHAM) या संस्थेने आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध आणि आयुष पद्धतींच्या इतर प्रकारांमध्ये संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी _ यांच्या नेतृत्वात एका राष्ट्रीय स्तरीय आयुष कृती दलाची स्थापना केली - डॉ सुदिप्त नारायण रॉय.

व्यक्ती विशेष

30 सप्टेंबर 2021 रोजी व्हाइस अॅडमिरल विनय बधवार यांच्या सेवानिवृत्तीनंतर, भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर - व्हाइस एडमिरल अधीर अरोरा.

क्रिडा

‘महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध विजेतेपद’ स्पर्धेची पाचवी आवृत्ती _ येथे 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित केली जाईल - हिसार, हरियाणा.

_ हिने लिमा (पेरू) येथे झालेल्या ‘ISSF कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद’ स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटाचे सुवर्णपदक जिंकले - मनु भाकर.

राज्य विशेष

तेलंगणा सरकारने 01 ऑक्टोबर 2021 रोजी _ येथे 'हरा भरा' प्रकल्प सुरू केला, जो सीडकॉप्टर ड्रोनद्वारे चालवली जाणारी भारतातील पहिली हवाई बीजारोपण मोहीम आहे - केबीआर अभयारण्य, हैदराबाद.

_ सरकारने बालविवाह थांबवण्यासाठी 'पोनवक्क' नावाचा एक नवीन प्रकल्प सुरू केला - केरळ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सामान्य ज्ञान

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना – 14 ऑगस्ट 1993.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना - 19 फेब्रुवारी 2004.

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना - 31 जानेवारी 1992.

राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना - 11 मे 2000.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना - 12 ऑक्टोबर 1993.

केंद्रीय विद्युत नियमन आयोगाची स्थापना - 24 जुलै 1998.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...