Monday, 3 October 2022

एका ओळीत सारांश, 01 ऑक्टोबर 2021


दिनविशेष

2021 साली ‘आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस’ (1 ऑक्टोबर) याची संकल्पना - "डिजिटल इक्विटी फॉर ऑल एजेस".

जागतिक शाकाहारी दिवस - 1 ऑक्टोबर.

अर्थव्यवस्था

NTPC रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (REL) या कंपनीने राजस्थानमधील 470 मेगावॅट सौर प्रकल्प आणि गुजरातमधील 200 मेगावॅट सौर प्रकल्पासाठी त्याच्या पहिल्या हरित कर्जासाठी _ सोबत करार केला – बँक ऑफ इंडिया.

आंतरराष्ट्रीय

आरोग्य आणि जैववैद्यकीय विज्ञान क्षेत्रात सहकार्य आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन रिसर्च (ICER) याच्यासोबत सहकार्यासाठी भारत आणि _ या देशांनी 30 सप्टेंबर 2021 रोजी दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली - अमेरिका.

‘नाइट फ्रँक’ या संस्थेच्या अभ्यासानुसार, रिअल इस्टेटसाठी जगातील सर्वात हरित शहर - लंडन (त्याखालोखाल शांघाय, न्यूयॉर्क, पॅरिस आणि वॉशिंग्टन डीसी).

रिअल इस्टेटसाठी भारतीय हरित शहरे - दिल्ली (जागतिक स्तरावर 63 वा), चेन्नई (224 वा), मुंबई (240 वा), हैदराबाद (245 वा), बेंगळुरू (259 वा) आणि पुणे (260 वा).

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार आणि विकास परिषदेच्या पंधराव्या सत्राचे (UNCTAD15) _ येथे उद्घाटन करतील, जे 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2021 या काळात "सर्वांसाठी विषमता आणि असुरक्षिततेपासून समृद्धीपर्यंत" या विषयाखाली आयोजित केले जाईल - ब्रिजटाउन, बार्बाडोस.

‘ग्रीन इनिशिएटिव्ह’ याद्वारे कार्बन न्यूट्रल प्रमाणपत्र मिळवणारे पहिले आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थान - माचू पिचू, पेरू.

राष्ट्रीय

30 सप्टेंबर 2021 रोजी श्रम आणि रोजगार मंत्री, श्री भूपेंद्र यादव यांनी _ याला सुरुवात केली, जो तरुणांमध्ये रोजगारक्षमता वाढवण्यासाठी डिजिटल कौशल्य कार्यक्रम आहे – डिजीसक्षम / DigiSaksham.

वृद्धाच्या फायद्याची उत्पादने तयार करणाऱ्या स्टार्ट-अप कंपणीची निवड करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा प्रदान करणारे समर्पित संकेतस्थळ-आधारित मंच - 'सीनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन' (SAGE).

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) याने _ येथे पश्चिम क्षेत्रामधील पहिली राष्ट्रीय अन्न प्रयोगशाळा (NFL) स्थापन केली - JNPT, नवी मुंबई.

देशभरात विज्ञान संग्रहालयांद्वारे तर्कसंगत विचारसरणी निर्माण करण्यासाठी आणि अनुभवावर आधारित शिक्षण बळकट करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाचे __ आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) यांनी सामंजस्य करार केला - राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये परिषद.

आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळाच्या समितीने पुढील पाच वर्षांसाठी 'पीएम पोषण' योजनेला मंजुरी दिली, ज्याद्वारे विद्यमान मध्यान्ह भोजन योजनेचे नाव बदलून ____ असे केले जाईल - राष्ट्रीय पीएम-पोषण योजना (PM-POSHAN  / POshan SHAkti Nirman).

व्यक्ती विशेष

आयुध कारखाने मंडळ (OFB) याची उत्तराधिकारी संस्था असलेल्या, आयुध संचालनालयाचे पहिले महासंचालक (समन्वय आणि सेवा) - ई. आर. शेख.

यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) कडून घोषित ‘2021 ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड’चे भारतीय प्राप्तकर्ते - शिव नादर आणि मल्लिका श्रीनिवासन (भारतीय उद्योगपती).

‘कॉमनवेल्थ इनोव्हेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट पुरस्कार 2021’ याचा भारतीय विजेता - कैफ अली.

22 सप्टेंबर 2021 पासून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी - पद्मजा चुंडुरू.

2021-23 या कालावधीसाठी कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (CEAMA) याचे अध्यक्ष - एरिक ब्रागांझा.

क्रिडा

भारतात, पहिला एलजी हॉर्स पोलो कप स्पर्धा ____ येथे आयोजित केली गेली - द्रास, लडाख.

भारतीय हॉकी खेळाडू, ज्यांनी खेळातून निवृत्तीची घोषणा केली - रुपिंदर पाल सिंह आणि बीरेंद्र लाकरा.

राज्य विशेष

महाराष्ट्र सरकारने ____ येथे एक ‘युद्ध स्मारक-सह-संग्रहालय’ उभारण्याची योजना जाहीर केली - मुंबई.

कर्नाटक सरकारने वर्ष 2020 आणि वर्ष 2021 यासाठी ‘महात्मा गांधी सेवा पुरस्कार’ अनुक्रमे _ आणि श्री सिद्धगंगा शिक्षण संस्था आणि श्री सिद्धगंगा मठ (तुमाकुरू जिल्हा) यांना जाहीर केले - मीराबाई कोप्पीकर.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...