३० सप्टेंबर २०२२

हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार दिलीप तिर्की यांची ऐतिहासिक निवड.

भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य दिलीप तिर्की यांची काल हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली.

इतिहासात प्रथमच एक माजी खेळाडू आणि एक ऑलिम्पिकपटू राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे.

44 वर्षीय तिर्की यांनी 15 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकीर्दीत बचावपटू म्हणून 412 आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभाग नोंदवला आहे.

त्यांनी 1996 च्या अटलांटा इथं झालेल्या ऑलिंपिक खेळात, तसंच 2000 साली सिडनी आणि 2004 साली अथेन्स इथं झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

कोनांची मापे दर्शविणारा तक्ता

1. शून्यकोन - 0° मापाचा कोन 2. लघुकोन - 90° पेक्षा कमी 3. काटकोन - 90° मापाचा कोन 4. विशालकोन - 90°पेक्षा जास्त व 180° पेक्षा कमी 5. सरळकोन ...