Friday, 30 September 2022

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे महाराष्ट्राविषयी माहिती 

 महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.

महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

 महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

 महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

 महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

 विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

 महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

 संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
 संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

 महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...