Thursday 29 September 2022

पश्चिम विभागने पटकावले दुलीप करंडकचे जेतेपद.

पश्चिम विभागाने रविवारी दुलीप करंडकाच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली.

पश्चिम विभागने दक्षिण विभागावर 294 धावांनी विजय मिळवला.

याआधी 2009-10 मध्ये पश्चिम विभागाने दुलीप करंडक जिंकला होता.

तब्बल 12 वर्षांनंतर त्यांनी या स्पर्धेचे जेतेपद.

पश्चिम विभागाचे हे 19 वे विजेतेपद आहे.

पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावा केल्यानंतर दक्षिण विभागाने पहिल्या डावात 327 धावा करीत 57 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. यशस्वी जैसवालचे खणखणीत द्विशतक (265 धावा) व सर्फराझ खानचे दमदार शतकाच्या (नाबाद 127 धावा) जोरावर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 4 बाद 585 या धावसंख्येवर डाव घोषित केला. विजयासाठी 529 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण विभागाने 234 धावाच केल्या.

No comments:

Post a Comment