Thursday, 29 September 2022

स्वच्छ वायू सर्वेक्षण- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत(एनसीएपी) शहरांचे मानांकन.


 
गुजरातमध्ये एकता नगर येथे 23-24 सप्टेंबर दरम्यान पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेचे उद्घाटन केले.

प्रदूषण नियंत्रण आणि प्रतिबंध यावर आयोजित एका समांतर सत्रामध्ये राज्यांना राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत(एनसीएपी) प्रकाशित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण- शहरांचे मानांकन’ याविषयी माहिती देण्यात आली.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंत्रालय स्वच्छ वायू सर्वेक्षण सुरू करणार आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचा(एनसीएपी) भाग म्हणून 2025-26 पर्यंत वायू प्रदूषणात 40 टक्क्यापर्यंत घट करण्यासाठी शहर कृती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी देशातील 131 शहरांना मानांकन दिले जाणार आहे.

No comments:

Post a Comment