Friday 30 September 2022

24आठवड्यापर्यंतच्या गर्भपातासाठी सर्वोच्च न्यायालयात परवानगी

अविवाहित महिलांनाही 24 व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी.

सुरक्षित आणि कायदेशीरररित्या गर्भपात करण्यासाठी सर्व महिला पात्र आहेत. त्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कुठलाही भेदभाव करणे असंवैधानिक आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

अविवाहित महिलेनं परस्पर संमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधांनंतर गर्भधारणा झाली असल्यास तिला गर्भधारणेच्या 20 ते 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी मिळेल

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं हा निर्णय दिला

बलात्कारानंतर वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्याच्या तरतुदीअंतर्गत वैवाहिक संबंधांतून झालेल्या बलात्काराचाही समावेश करता येईल. मात्र त्यासाठी बलात्कार झाल्याचं सिद्ध व्हावं लागेल.

23 आठवडे आणि 5 दिवसांची गर्भवती असलेल्या एका 25 वर्षीय अविवाहित महिलेला दिल्ली उच्च न्यायालयानं गर्भपाताची परवानगी नाकारली होती. त्यामुळ तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...