नमस्कार मित्रांनो,
परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे
त्यामुळे आता घाई गडबड न करता, एकदम आत्मविश्वासाने आपल्याला परीक्षेला सामोरे जायचा आहे.
त्यासाठी आजपासूनच एक गोष्ट लक्षात ठेवा
की, माझं कसं होणार?,
परीक्षा खूप अवघड असते,
मी पास होईल का नाही??
स्पर्धा खूप आहे,
मी तर नुकताच अभ्यास सुरू केला आहे.
असे बरेच प्रश्न मनात गोंधळ करून जातात
त्यामुळे यावर एकच रामबाण उपाय तो म्हणजे
ह्या कटकटी पासून दूर राहा.
आणि फक्त आणि फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास यावरच पूर्णता तुम्ही लक्ष दिले पाहिजे.
आता आपण शेवटच्या दहा दिवसांमध्ये नेमकं काय केलं पाहिजे यावर सविस्तरपणे चर्चा करूया.
1. आता या स्टेजला नवीन पुस्तक हातात घेऊ नका जे काय आधी वाचले तेच पुन्हा पुन्हा रिविजन करा.
2. जर तुम्ही मायक्रो नोट्स शॉर्ट नोट्स काढल्या असतील तर त्याच रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा.
3 निगेटिव्ह लोकांपासून दूर रहा.
4. सी सॅट ला इथून पुढे जास्त वेळ दिला तरी हरकत नाही.
5. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमची तब्येत आणि आरोग्य याकडे तुम्ही कदापिही दुर्लक्ष करू नका कारण की वर्षांची मेहनत ही आजारी पडून घालवू नका नियमित शेडूल ठेवा योग्य तो व्यायाम करा.
6. खाण्याकडे पण लक्ष द्या.
जेवणाची वेळ यामध्ये बदल करू नका
जागरण शक्यतो टाळा.
वडापाव समोसा यासारखे जंक फूड किंवा पिझ्झा वगैरे असं पदार्थ खाणे टाळा.
शक्यतो फूट प्लेट्स, पौष्टिक आहार घ्या.
7. टेन्शन तर सर्वांनाच येतो अगदी मलाही येतो
मग एकच डायलॉग आठवायचा,
बोले तो टेन्शन नही लेनेका मामू. 😁
8. शिस्तप्रिय बना, आणि शेडूल प्रॉपर पाळा
उगीचच परीक्षा जवळ आली म्हणून 14 तास पण राहता सोळा तास करण्याच्या भानगडीत पडू नका.
9. कुठल्याही परिस्थितीत तणाव आला तर शांत राहण्याचा प्रयत्न करा.
10. दुसऱ्याला दाखवायचा आहे म्हणून स्वतःचा हुशारी पणा दाखवू नका.
किंवा मला किती येत आहे त्याला येत नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून स्वतःचा कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नका.
11.शक्यतो वरील गोष्टी अमलात आणण्याचा प्रयत्न करा.
12.CSAT ला वेळ देता योग्य आहे पण g.s. कडेपण दुर्लक्ष नको.
13. कारण सुद्धा तितकाच महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला जर सत्तर ऐंशी मार्क पडले तर तुम्ही स्पर्धेत ना बाहेर पण होऊ शकतात त्यामुळे किमान शंभर चा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करा.
14. कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा.
15. पेपरच्या दिवशी नेमकं काय करायचं हे आपण पुढील भागात पाहू या.
त्यामध्ये आपण पेपरच्या दिवशी स्वतःचं टेंपरामेंट कशा पद्धतीने मेंटेन ठेवायचं या गोष्टी आपण पाहणार आहोत..
क्रमश..
No comments:
Post a Comment