Tuesday 9 August 2022

संयुक्त पूर्व परीक्षा

 नमस्कार मित्रांनो,


आज आपण शेवटच्या 60 दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी आणि 60 गुण कसे मिळवावेत याबाबत चर्चा करूयात..


⭕️ संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल पाहता आता सुरक्षित गुण किती असतील याबाबत कोणीच निश्चित सांगू शकत नाही. पहिल्या उत्तरतालिका नुसार किमान 60 गुण मिळवले तरच मुख्य परीक्षेला असण्याची खात्री राहणार आहे. सर्वांनी पूर्व परीक्षेला ठरवून 60 गुणांच्या वर स्कोर करण्याची आवश्यकता आहे.


⭕️ इतिहास -

मागील संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पाहता असे लक्षात येते की नेहमीच त्रास देणाऱ्या इतिहास या विषयाने विद्यार्थी मित्रांना भरपूर मदत केलेली आहे. 15 पैकी 14 गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत त्यामुळे यंदा इतिहासामध्ये, जर पेपरचा दर्जा मागील प्रमाणेच राहिला तर, किमान 12 गुण मिळवणे अनिवार्य राहणार आहे. इतिहासाचे तयारी करण्यासाठी गाठाळ सर किंवा कठारे सर या दोघांपैकी एका चे पुस्तक आपण वापरू शकता. इतिहासामध्ये ज्ञान मिळवणे मर्यादीत असल्याने लॉजिक डेव्हलपमेंट आणि एलिमिनेशन टेक्निक्स खूप काम करतात.त्याबाबत आपण आवर्जून विचार करावा


⭕️भगोल-

बाबतीत,15 पैकी किमान 10 गुण मिळाले तर आपण पूर्व परीक्षा सहजासहजी पास होऊ शकतो.भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सर किंवा खातीब सर किंवा दीपस्तंभ प्रकाशन यांचे पैकी कोणतेही एक महाराष्ट्राच्या भूगोल साठी वापरावे आणि भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचे पुस्तक वापरावे.


⭕️पॉलिटी-

 या विषयांमध्ये पूर्वी 10 पैकी 10 गुण मिळतात मात्र अभ्यासक्रमाचा आवाका व त्या तुलनेमध्ये कमी गुणांचा भारांक आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची वाढत असलेली खोली पाहता सध्या आपणास 10 पैकी 7 ते 8 गुण मिळवणे आवश्यक असते. लक्ष्मीकांत सरांचे अथवा  कोळंबे सरांचे पुस्तक आपण यासाठी वापरू शकतो तसेच पंचायत राज या घटकावर येणाऱ्या 2 ते 3 प्रश्नांसाठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज हे पुस्तक उपयुक्त ठरते. त्याचे वारंवार वाचन केले पाहिजे. शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत व त्याची वारंवार उजळणी झाली पाहिजे तरच प्रचंड डेटा आपल्या लक्षात राहू शकतो.


⭕️अर्थशास्त्र-

 येणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी सध्या कमी होत आहे म्हणजेच केवळ सर्वसामान्य अभ्यासावर आपण 15 पैकी 10 ते 12 गुण मिळवू शकतो. यासाठी देसले सर किंवा कोळंबे सर पैकी कोणतेही एक पुस्तक वाचण्यास पुरेसे ठरते. अर्थशास्त्राचे आयोगाचे मागील काही वर्षांचे प्रश्न पाहिल्यास आयोग कोणत्या घटकांवर किती आणि कसे प्रश्न विचारतो हे लक्षात येऊ शकते त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नांना बिलकुल दुर्लक्षित करू नये.


⭕️विज्ञान -

हा घटक सर्वसामान्यपणे सर्वच जनतेला किचकट वाटणारा विषय आहे तसेच प्रश्नांचा दर्जा मध्ये आयोगाने सातत्य राखलेले नाही. त्यामुळे कधी अभ्यास करून कमी मार्क तर कधी अभ्यास न करता ही सरासरी मार्क मिळतात मात्र तरीही स्टेट बोर्ड इयत्ता 7 ते 10 वी च्या पुस्तकांवर आपली कमांड असायला हवी किंवा सचिन भस्के सरांच्या पुस्तकाच्या किमान 3 ते 4 उजळण्या व्हायला हव्यात. लक्षात ठेवा की जर विज्ञान विषय अवघड आला तर तो सर्वांसाठी अवघड असेल आणि सोपा ला करतो सर्वांसाठीच सोपा असेल त्यामुळे या विषयावर ती मेरीट ठरण्याची शक्यता फार कमी असते.


⭕️ चालू घडामोडी-

हा पूर्व परीक्षांमधील सर्वांत अनिश्चित विषय मला वाटतो.यासाठी आयोग नक्की कोणता source वापरतो हे निश्चित समजत नाही. मात्र असे असले तरीही 15 पैकी 8 प्रश्न प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्याने सुटू शकतात. परिक्रमा हे मासिक किंवा अभिनव अथवा सिंपलिफाईड प्रकाशनाचे वार्षिकी यातून बऱ्याच अंशी घटना कव्हर होतात. त्या पुस्तकांच्या 2 ते 3 उजळण्या केल्यास किमान 7 ते 8 गुण पडण्यास हरकत नाही.


⭕️गणित बुद्धिमत्ता -

हा विषय पूर्व परीक्षांमधील मार्क देणारा विषय म्हणून ओळखला जातो मात्र काही विद्यार्थ्यांना हा विषय की  किचकट जातो मात्र दररोज सराव केल्यास या विषयाची भीती मनातून निघू शकते. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पहा व आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत यावरून बाजारात सापडणारे कोणतेही एक पुस्तक घेऊन त्यातून दररोज दोन ते अडीच तास सराव अपेक्षित आहे.


⭕️अशाप्रकारे एकंदरीत आपण 60 गुणांची गोळाबेरीज परीक्षेपूर्वी जमा केली आणि त्यानुसार विषयांना वेळ वाटून दिला आणि उजळणी केली तर निश्‍चितपणे आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतो. जितके जास्त गुण असतील तितकी पूर्व परीक्षा पास होण्याची खात्री अधिक असेल व त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल पर्यंतचा वेळ वाट पाहण्यात जाणार नाही.

त्यामुळे वरील प्रमाणे अभ्यास करून अथवा आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करून 60 प्लस गुण मिळवणे आवश्यक ठरते.


❇️ अभ्यासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.


No comments:

Post a Comment