Sunday 1 September 2024

स्पर्धा परीक्षा - इतिहास विषय तयारी


● मुळात इतिहास हा विषय आवडीने अभ्यास करण्याचा आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना यातील वंशावळी, सणावळी याची अकारण भीती वाटते. इतिहास विषयाच्या अभ्यासाची पायाभरणी पद्धतशीरपणे केली तर काहीच कठीण नाही. 


● प्रामुख्याने इतिहास विषयाचे तीन भाग पडतात. प्रथम म्हणजे प्राचीन इतिहास, दुसरा मध्ययुगीन इतिहास व तिसरा म्हणजे अर्वाचीन इतिहास. यातही आपल्याला भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. मग एमपीएससी वा तत्सम स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासावाच लागेल.

इतिहास अभ्यासाची पूर्वतयारी करताना त्याला प्रामुख्याने तीन भागात विभागून अभ्यास करणे सोईचे होईल. 


● प्राचीन इतिहास अभ्यासायचा म्हटला तर अगदी सिंध संस्कृतीच्या इतिहास पासून सुरुवात करून वैदिक युग, बौद्ध साहित्य, जैन साहित्य, मगध राज्य, मौर्य साम्राज्य त्यानंतरची राजवंश जसे कण्व, कुपाल, गुप्त साम्राज्य, हुण, राजपूत, गुर्जर, प्रतिहार, कनौज, पाल, येथपर्यंतचा कालावधी सर्व तपशीलवार अभ्यासणे आलेच. या सर्वांच्या काळातील वैशिष्ट्ये, सणावळी लक्षात ठेवणे जिकरीचे काम तर आहेच; सोबतच कठीण आहे. 


● पण त्यासाठी वर्ग 8 ते 12 पर्यंतची इतिहासाची पुस्तके फारच उपयोगी पडतात. एनसीईआरटी व राज्य शिक्षण मंडळाची पुस्तके वाचावी लागतील. त्यातून स्वत:ची टिपणे काढावीत व स्वतंत्र वहीत लिहून ठेवावीत. हीच बाब मध्ययुगीन इतिहास व अर्वाचीन इतिहासाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. 


● मध्ययुगीन इतिहास म्हटला तर सुुलतान घराण्यापासून तर खिलजी, तुघलक, लोधी, मुगल साम्राज्यातील बाबर, हुमायुन, अकबर, शहाजहान, औरंगजेबपर्यंतचा तपशीलवार इतिहास अभ्यासावा लागेल, तर अर्वाचीन इतिहासासाठी 1850 च्या उठावापासून तर स्वातंत्र्यापर्यंत व स्वातंत्र्योत्तर काळातील अगदी आतापर्यंतच्या घटनांचा अभ्यासही करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे इतिहासाची विभागणी करून पूर्वतयारी होण्यात मदत होते.

No comments:

Post a Comment