Sunday, 31 July 2022

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाला "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार प्रदान



सोलापूर: प्रमोद बनसोडे


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाला सोमवार दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे अध्यक्षतेखालील तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव संजय नवले, पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी स्विकारला.

     पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीत व विद्यापीठाच्या गीताने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला.

   यावर्षीचा सोलापूर विद्यापीठाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार  हा एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाला मिळाला असुन अल्पावधीतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. महाविद्यालयातुन इंजिनिअरींग शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत नागरीक घडविण्याची महत्वकांक्षा आपल्या खांद्यावर घेऊन सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालय गगनभरारी घेत आहे. अल्पावधीतच यशाच्या शिखरावर गुणवत्ता सिद्ध करून पोचलेले पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज आहे. शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा निर्माण करून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

   पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयाला यंदाचा "उत्कृष्ट महाविद्यालय" पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांना प्रदान करण्यात आला.

  या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, 

उद्योजक किशोर चंडक, डाॅ. विकास पाटील, डाॅ. सुरेश पवार आदीउपस्थित होते.

   या कार्यक्रमास संस्थेचे सचिव  संजय नवले, सोलापूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, सोलापूर सिंहगड इन्स्टिट्युटचे इस्टेट मॅनेजर डाॅ. दत्तात्रय नवले, प्रा. अनिल निकम, प्रा. सुमित इंगोले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...