२३ जुलै २०२२

रुपयाची ऐतिहासिक पडझड; डॉलरच्या तुलनेत गाठला ८० चा टप्पा.


🌷भारतीय चलन रुपयाचं डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालंय. मंगळवारी (१९ जुलै) ८०.०५ रुपये प्रति डॉलरपर्यंत ही पडझड झाली. आजपर्यतच्या इतिहासातील हे रुपयाचं सर्वात निचांकी मूल्य आहे. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्याने पडझड सुरू आहे. मागील सत्रात रुपया ७९.९७ रुपये प्रति डॉलर होता. मंगळवारी सकाळी रुपयाची सुरुवात ७९.९८ प्रति डॉलरने झाली आणि लगेचच रुपयाचं मूल्य आणखी कमी होऊन ८०.०५ प्रति डॉलर झालं.


🌷रपयाचं मूल्य ८०.०५ पर्यंत खाली आल्यावर ते रुपया ७९.९३/९४ प्रति डॉलर ट्रेंड करत होता. सोमवारी परदेशी चलन बाजारात अमेरिकेन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १६ पैशांनी घसरला आणि ७९.९८ प्रति डॉलरवर बाजार बंद झाला. मंगळवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच रुपयाची ऐतिहासिक पडझड होऊन ८०.०५ च्या स्तरावर गेला.


🌷शक्रवारी रुपयाच्या मुल्यात १७ पैशांची वाढ झाली आणि बाजार ७९.८२ प्रति डॉलरवर बंद झाला. त्यामुळे काही दिवस रुपयाचं मूल्य ७९.७९ ते ८०.२० प्रति डॉलर असेल, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी वर्तवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...