Saturday 23 July 2022

सरसकट काँपीपेस्टची गरज आहे का ?



सरसकट UPSC Pattern राबवण्याआधी काही गोष्टीचा विचार व्हायला हवा. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याला दबाव न समजता या मागण्यांचा सर्वकष विचार व्हावा.


1. UPSC मधून दरवर्षी IAS, IPS ही धोरणात्मक निर्णय घेणारी पदे भरली जातात तर MPSC राज्यसेवा  मधून साधारण 75% भरती class 2 पदांची असते. 


2. DC, DySP, DyCEO वगळता इतर कोणालाही IAS, IPS होण्याची संधी नाही. त्यातही DC, DySP पदांची भरती दरवर्षी होत नाही. 


3  बऱ्याच राज्यात मुख्य परीक्षा जरी लेखी असली तरी ती Average 1000  mark चीच आहे.परीक्षा पद्धती ठरवताना त्या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांच्या दर्जाचा विचार व्हायला हवा. सध्याच्या पँटर्ननुसार जिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार या दोन पदांचा अभ्यासक्रम सारखा करण्यात आला आहे. 


3. तसेच वैकल्पिक विषयामध्ये भविष्यात तांत्रिक आणि अतांत्रिक विषय असे वाद होऊ शकतात. साधारण तांत्रिक विषय विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळवून देतात. अतांत्रिक विषय घेतलेले विद्यार्थी या सगळ्यात मागे पडू शकतात. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सोडल्यास इतर कोणत्याही मोठ्या राज्यात वैकल्पिक विषय लागू नाहीत.


4. लिहण्याच्या माध्यमाचाही फरक पडू शकतो. इंग्रजी मध्ये वेगात लिहणे सोपे असल्याने तुलनेने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पेपर कव्हर करायला अडचण येऊ शकते. 


4. मुलाखती मध्ये जास्त mark चा फरक पडू नये म्हणून जवळपास सर्व राज्यामध्ये 25 -100 mark चीच मुलाखत आहे. आंध्रप्रदेश सारख्या राज्यांनी ग्रामीण मुले मागे पडू नये म्हणून मुलाखतच रद्द केली आहे. तर कर्नाटकसारख्या राज्याने मुलाखतीचे गुण 200 वरुन 25 केले. असे असताना MPSC ची 275 mark ची मुलाखत कितपत संयुक्तिक आहे ?


5. नवीन पँटर्ननुसार क्लासेसचे अवास्तव महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे MPSC करणे प्रंचड खर्चिक बाब होणार असल्याने ग्रामीण गरीब विद्यार्थी या स्पर्धेतून आपोआप बाहेर फेकला जाणार आहे.  तसेच UPSC मध्ये 20 -30 अधिकारी वाढविण्यासाठी 2.5-3 लाख विद्यार्थी क्लासेसच्या दावणीला बांधले जाऊ शकतात. सद्यस्थितीत ग्रामीण भागात राहून देखील अभ्यास करणारे विद्यार्थी भरपूर आहेत. आता त्यांना Essay Writing, GS Test series, Optional यासाठी पुणे- दिल्ली मधील क्लासेस लावणे भाग पडेल आणि दरवर्षी 1.5-2 लाख रुपये खर्च करावे लागतील. 


6. जवळपास सगळ्या मोठ्या राज्याच्या राज्यसेवा परीक्षा पँटर्न पाहिल्यास  लक्षात येते की एकाही राज्याने UPSC pattern जशाचा तसा फाँलो केला नाही आणि ते न करता देखील त्या राज्यामध्ये UPSC पास होण्याच प्रमाण लक्षणीय आहे. विशेषकरून दक्षिणेकडील राज्यात 800 पेक्षा कमी मार्कची  मुख्य परीक्षा असून देखील UPSC मध्ये टक्का जास्त आहे. 


काही महत्त्वाचे राज्य आणि तेथील परीक्षा पद्धती 


महाराष्ट्रात - मुख्य 1750 + मुलाखत 275


उत्तरप्रदेश -  मुख्य 1350  + मुलाखत 100


केरळ - मुख्य 300 + मुलाखत 100


तेलंगणा - मुख्य 800 + मुलाखत 100


आंध्रप्रदेश - मुख्य 750 + मुलाखत नाही


तामिळनाडू Group A - मुख्य 750 Mark + मुलाखत 100


कर्नाटक - मुख्य  1250 + मुलाखत 25 


बिहार - मुख्य 900 + मुलाखत 120


राजस्थान - मुख्य 800 + मुलाखत 100

No comments:

Post a Comment