Friday, 1 July 2022

घटकराज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील तुलना


(1) घटकराज्याचे केंद्रासोबतचे संबंध हे संघराज्यीय स्वरूपाचे आहेत.
▪️केंद्रशासित प्रदेशाचे केंद्राशी असलेले संबंध एकात्म स्वरूपाचे आहेत.

(2) घटकराज्य आणि केंद्र यांच्यामध्ये अधिकारांचे वाटप झालेले आहे.
📌याउलट, केंद्रशासित प्रदेशांवर थेट केंद्राचे नियंत्रण आणि प्रशासन असते.

(3) घटकराज्यांना स्वायत्तता असते.
▪️केंद्रशासित प्रदेशांना स्वायत्तता नसते..

(4) घटकराज्यांच्या प्रशासकीय संरचनेत एकसारखेपणा आढळतो.
📌केंद्रशासित प्रदेशांची प्रशासकीय रचना भिन्न स्वरूपाची आहे.

(5) घटकराज्याच्या कार्यकारी प्रमुखाला राज्यपाल म्हणतात.
▪️केंद्रशासित प्रदेशांचा कार्यकारी प्रमुख विविध पदनामांनी ओळखला जातो. उदा. प्रशासक किंवा ले. गव्हर्नर किंवा मुख्य प्रशासक. इ.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...